Know All About Dattatreya Hosabale RSS New General Secretary, Went prison during emergency

Know All About Dattatreya Hosabale : जाणून घ्या, कोण आहेत संघाचे नवे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे? आणीबाणीत गेले होते तुरुंगात, फुटबॉलची आहे आवड

सन 2009 पासून भैयाजी जोशी (Suresh Joshi) यांच्या सलग चार कार्यकाळांनंतर शनिवारी दत्तात्रेय होसबोले यांची संघाचे नवे सरकार्यवाह म्हणून (Dattatreya Hosabale RSS New General Secretary) निवड झाली. त्यांची निवड संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेद्वारे करण्यात आली आहे. दत्तात्रेय होसबळे कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील निवासी आहेत. संघाचे दिग्गजांपैकी ते एक मानले जातात. Know All About Dattatreya Hosabale RSS New General Secretary, Went prison during emergency


विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : सन 2009 पासून भैयाजी जोशी (Suresh Joshi) यांच्या सलग चार कार्यकाळांनंतर शनिवारी दत्तात्रेय होसबोले यांची संघाचे नवे सरकार्यवाह म्हणून (Dattatreya Hosabale RSS New General Secretary) निवड झाली. त्यांची निवड संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेद्वारे करण्यात आली आहे. दत्तात्रेय होसबळे कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील निवासी आहेत. संघाचे दिग्गजांपैकी ते एक मानले जातात.

दत्तात्रेय होसबळे संघामध्ये ‘दत्ताजी’ या नावाने प्रसिद्ध आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संधात खूप लोकप्रियसुद्धा आहेत. ते कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील सोरबा तालुक्याच्या एका छोट्याशा गावातील रहिवासी आहेत. दत्तात्रेय होसबळेंचा जन्म 1 डिसेंबर 1955 रोजी झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण सागरमध्ये झाले. तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी बंगळुरू गाठले होते.कोण आहेत संघाचे नवे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे?

► दत्तात्रेय होसबळे यांनी बंगळुरूच्या प्रसिद्ध राष्ट्रीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. यानंतर त्यांनी साहित्याच्या अभ्यासासाठी म्हैसूर विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी इंग्रजी साहित्यात आपले शिक्षण पूर्ण केले.
► संघामुळे प्रभावित होऊन ते सन 1968 मध्ये संघाशी जोडले गेले. त्यानंतर 1972 मध्ये त्यांनी ABVP विद्यार्थी परिषद जॉइन केली. दत्तात्रेय होसबळे सन 1978 मध्ये ABVPचे पूर्णवेळ कार्यकर्ता बनले. 15 वर्षांपर्यंत ते मुंबई मुख्यालयात ABVPचे महासचिव राहिले.
► विद्यार्थिदशेत दत्तात्रेय होसबळे यांची साहित्यिक उपक्रमांमध्ये जास्त रुची होती. आपल्या शिक्षणाच्या काळात ते खूप सक्रिय होते. वायएन कृष्णमूर्ती आणि गोपाल कृष्ण अडिगा यांच्यासोबतच कर्नाटकच्या जवळजवळ सर्व पत्रकारांशी आणि लेखकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.
► इंदिरा गांधी यांच्या सत्तेच्या काळात आणीबाणीच्या वेळी लोकशाही बहाल करण्याकरिता जो संघर्ष उडाला होता त्यादरम्यान त्यांना एक वर्षाहून जास्त काळ तुरुंगातही राहावे लागेल होते. त्यांनी गुवाहाटी, आसाम, जागतिक विद्यार्थी संघटना आणि युवा विकास केंद्र स्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
► होसबळे हे कन्नड मासिक ‘असीमा’चे संस्थापक संपादक राहिलेले आहेत. सन 2004 मध्ये संघाच्या बौद्धिक शाखेची धुरा त्यांच्याकडे आली. दत्तात्रय होसबळे कन्नड, हिंदी, इंग्रजी, तामिळ आणि संस्कृत भाषेत खूप निपुण आहेत.
► दत्तात्रेय होसबोले हे फुटबॉलचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांनी फुटबॉलला जागतिक ऐक्याचे प्रतीक असल्याचे म्हटले होते. होसबळे अमेरिका आणि ब्रिटेनमधील हिंदू स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक उपक्रमांचे संरक्षकही राहिलेले आहेत.

सरकार्यवाह पदाचा कार्यकाळ तीन वर्षे

भारतीय धर्मनिरपेक्षता हिंदूविरोधी असण्यावर आपले मत देताना होसबळे म्हणतात की, जेव्हा भारताच्या विचारांचा प्रश्न येतो, तेव्हा कोणताही वाद असू शकत नाही. ते म्हणाले की, विचार वेगवेगळे असू शकतात, सर्व विचारांना जागा मिळणे गरजेचे आहे. ते एकमेकांचे विरोधाभासी असणे गरजेचे नाही. दत्तात्रेय होसबळे आता पुढील तीन वर्षांपर्यंत संघाचे सरकार्यवाह पदावर राहतील. सरकार्यवाह पदाची निवड दर तीन वर्षांनी होते.

Know All About Dattatreya Hosabale RSS New General Secretary, Went prison during emergency

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*