Know About IPS Shivdeep Lande Who solved mystery of Mansukh Hiren murder case

जाणून घ्या, कोण आहेत IPS Shivdeep Lande?, काय आहे त्यांचे शिवसेना कनेक्शन?; मनसुख हत्याकांडाचे उकलले गूढ

मुंबईतील देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका कारमध्ये विस्फोटके आढळली होती. या कारचा मालक मनसुख हिरेनचा गूढ मृत्यू झाला. विस्फोटकांच्या प्रकरणामुळेच हिरेन यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. आता मुंबई एटीएसचे शिवदीप लांडे (IPS Shivdeep Lande) यांनी मनसुख हिरेन हत्याकांडाचे गूढ सोडवल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी एटीएसने दोन जणांना अटक केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका कारमध्ये विस्फोटके आढळली होती. या कारचा मालक मनसुख हिरेनचा गूढ मृत्यू झाला. विस्फोटकांच्या प्रकरणामुळेच हिरेन यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. आता मुंबई एटीएसचे शिवदीप लांडे (IPS Shivdeep Lande) यांनी मनसुख हिरेन हत्याकांडाचे गूढ सोडवल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी एटीएसने दोन जणांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांपैकी एक निलंबित पोलीस आणि दुसरा मोठा बुकी आहे. या दोन्ही आरोपींना कोर्टाने 30 मार्चपर्यंत एटीएसची कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे एनआयएला हे प्रकरण स्वतःकडे घेण्याचे आदेश मिळाल्यानंतर काही तासांतसच एटीएसने या प्रकरणाचा गुंता सोडवल्याचे म्हटले आहे.

Know About IPS Shivdeep Lande Who solved mystery of Mansukh Hiren murder case

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास शिवदीप लांडेंनी केला

आयपीएस शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास झाला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हे प्रकरण सोडवण्याविषयी माहिती दिली. शिवदीप लांडे यांनी लिहिले आहे की, हे प्रकरण माझ्या कारकीर्दीतील एक अतिशय आव्हानात्मक आणि महत्त्वाचे प्रकरण होते. हे केस सोडवण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेतल्याबद्दल त्यांनी संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. शिवदीप लांडे हे बिहार केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. बिहारमध्ये तैनात असताना ते खूप प्रसिद्ध होते. शिवदीप लांडे यांचा महाराष्ट्रातील शिवसेनेशीही संबंध आहे.

लांडे यांचे शिवसेना कनेक्शन

महाराष्ट्राचे डॅशिंग आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यांची कन्या डॉ. ममता शिवतारे या शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत. विजय शिवतारे यांनी महाराष्ट्रातील जलसंपदा राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांना शिवसेनेचे प्रवक्तेही बनविण्यात आले. तथापि, 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शिवदीप लांडे पाटण्याहून मुंबईला आले तेव्हा त्यांना मुंबईत नार्कोटिक्स विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. तेथे त्यांनी उत्कृष्ट काम केले. ते सध्या महाराष्ट्रात एटीएसचे डीआयजी म्हणून काम पाहत आहेत.

बिहारमध्ये रॉबिनहुड म्हणून प्रसिद्ध

लांडे यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील परसा गावात झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. शिवदीप लांडे यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. तसेच शिक्षण घेत असताना त्यांनी मुंबईत राहून यूपीएससीची तयारी केली, त्यानंतर त्यांची यूपीएससीमध्ये निवड झाली. ते बिहार कॅडरचे आयपीएस निवडले गेले. शिवदीप लांडे यांची पहिली पोस्टिंग बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात जमालपूर येथे झाली. बिहारमधील पाटणा शहरातही शिवदीप लांडे खूप प्रसिद्ध आहेत. त्यांना पाटण्याचे रॉबिनहुड असेही म्हणतात.

रोडरोमियोंचे कर्दनकाळ, मुलींना दिला होता वैयक्तिक फोन नंबर

बिहारमध्ये शिवदीप लांडे यांच्या नावावर अनेक चांगल्या कामांची नोंद आहे. विशेषत: रोडरोमियोंवर त्यांची कडक कारवाई, महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थिनींमध्ये त्यांची प्रतिमा हीरोपक्षा कमी नव्हती. मवाल्यांना धडा शिकवण्यासाठी आणि मुलींच्या मदतीसाठी कधीही उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी आपला वैयक्तिक मोबाइल नंबर मुलींना दिला होता. परिणामी, हळूहळू रोडरोमियोंचा सफाया झाला, कारण तक्रार मिळताच शिवदीप लांडे स्वत: तेथे जात असत.

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*