Kisan Rail: 100th round of Kisan Railway completed from Marathwada, transport of 34 thousand tons of onions

Kisan Rail: किसान रेल्वेची 100वी फेरी मराठवाड्यातून पूर्ण, 34 हजार टन कांद्याची वाहतूक

भारतातील शेतकऱ्यांना देशभरात आपला माल कुठेही विकता यावा यासाठी स्वातंत्र्य व सुविधा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या किसान रेल्वेला (Kisan Rail) 75 दिवस पूर्ण झाले आहेत. यादरम्यान किसान रेल्वेने शनिवारी आपली 100वी फेरी मराठवाड्यातून पूर्ण केली. यावेळी या रेल्वेत तब्बल 33,885 टन कांदे आणि 190 टन द्राक्षांची वाहतूक करण्यात आली.


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : भारतातील शेतकऱ्यांना देशभरात आपला माल कुठेही विकता यावा यासाठी स्वातंत्र्य व सुविधा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या किसान रेल्वेला (Kisan Rail) 75 दिवस पूर्ण झाले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे की, यादरम्यान किसान रेल्वेने शनिवारी आपली 100वी फेरी मराठवाड्यातून पूर्ण केली. यावेळी या रेल्वेत तब्बल 33,885 टन कांदे आणि 190 टन द्राक्षांची वाहतूक करण्यात आली.

किसान रेल्वेचा नांदेड विभागातील नगरसोल रेल्वेस्थानकातून प्रारंभ झाला, या रेल्वेतून भारतातील पूर्वोत्तर राज्यांसाठी कांदे आणि द्राक्षांची वाहतूक करण्यात आली. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राकेश म्हणाले की, या विशेष रेल्वेमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी सुविधा मिळाली आहे.

केंद्रीय योजनेअंतर्गत शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाहतूक खर्चात 50 टक्के सवलत देणारी किसान रेल्वे ही आता शेतकरी, व्यापारी आणि मालवाहतूक करणार्‍यांना अगदी सुदूरपर्यंत आपले शेती उत्पादने सोयीस्कररीत्या, त्रासविरहित वाहतुकीचा पर्याय म्हणून पुढे आली आहे.

नांदेड विभागातील पहिली किसान रेल्वे सेवा यावर्षी 5 जानेवारीला नगरसोल ते आसाममधील न्यू गुवाहाटीदरम्यानच्या फेरीद्वारे सुरू झाली. मालदा टाउन, न्यू जलपाईगुडी, आगरताळा, बैहाटा, नौगछिया, डांकुनी, धुपगुरी, चितपूर, संक्राईल आणि फतुहा अशी ठिकाणे आहेत, जेथे किसान रेल्वेद्वारे मराठवाड्यातून शेतीमाल पोहोचलेला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*