Khalistan terrorist arrested from Nanded, several Hindu leaders were on the hit list

खलिस्तान समर्थक दहशतवाद्याला नांदेडमधून अटक, अनेक हिंदू नेते होते हिटलिस्टवर

नांदेड जिल्ह्यातून खलिस्तान समर्थक दहशतवादी अटक करण्यात आली आहे. पंजाब आणि महाराष्ट्र पोलिसांच्या सीआयडी पथकाने रविवारी संयुक्त कारवाईत खलिस्तानी दहशतवाद्याला अटक केली, परंतु भारतविरोधी कारवायांचा तपास चालू असल्याने त्याचा खुलासा झाला नव्हता. अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव सरबजितसिंग किरात असे आहे. तो पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी एका निवेदनाद्वारे याची माहिती दिली. Khalistan terrorist arrested from Nanded, several Hindu leaders were on the hit list


विशेष प्रतिनिधी

नांदेड : नांदेड जिल्ह्यातून खलिस्तान समर्थक दहशतवादी अटक करण्यात आली आहे. पंजाब आणि महाराष्ट्र पोलिसांच्या सीआयडी पथकाने रविवारी संयुक्त कारवाईत खलिस्तानी दहशतवाद्याला अटक केली, परंतु भारतविरोधी कारवायांचा तपास चालू असल्याने त्याचा खुलासा झाला नव्हता. अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव सरबजितसिंग किरात असे आहे. तो पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी एका निवेदनाद्वारे याची माहिती दिली.

अटक करण्यात आलेला सरबजीतसिंघ किरात हा खलिस्तान जिंदाबाद या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. बेल्जियमशी संबंधित खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनेच्या तो संपर्कात होता. त्याच देशातून त्याला दहशतवादी कारवायांसाठी पैशांचा पुरवठा होत होता. खलिस्तानचा विरोध करणारे हिंदू संघटनेचे नेते त्यांचे लक्ष्य असल्याचे सांगण्यात येत आहे.सरबजितसिंघ हा नांदेडमध्ये लपल्याची गुप्त माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पंजाब पोलिसांचे सीआयडी पथक नांदेडमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिकारघाट परिसरातून त्याला अटक केली.

Khalistan terrorist arrested from Nanded, several Hindu leaders were on the hit list

याप्रकरणी पंजाबच्या अमृतसरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याआधी तीन जणांना अटक झाली होती. तर एक फरार नांदेडमध्ये लपला होता. अखेर त्यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*