वृत्तसंस्था
ओटावा : केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केले आणि शेतकरी आंदोलन समाप्त झाल्यानंतर खलिस्तानच्या लढयाला खरी सुरुवात होईल, असे फुत्कार कॅनडातील खलिस्तानवादी चळवळीचा पुरस्कर्ता आणि पोएटिक जस्टीस फाउंडेशनचा संस्थापक धलीवाल याने काढले आहेत. Khalistan struggle begins after repeal of three agricultural laws separatist Dhaliwal death
दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी घुसले आहेत. त्याच्या पाठींब्यावर आंदोलन सुरू आहे, हा अंदाज आता धालीवाल याच्या फुत्कारानंतर अधिक खरा ठरला आहे. दिल्लीतील प्रजासत्ताक दिनी झालेला हिंसाचार आणि लाल किल्ल्यावर फडकविलेला खलिस्तानवादी ध्वज, या दोन घटना खलिस्तानवादी फुटीरवादी आणि पाकिस्तानी समर्थकांचे कृत्य होते, हे आता अधिकच उघड झाले.
कॅनडात एक फुटीरवादी भाषण करतानाचा धालीवाल याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे भाषण त्याने कॅनडातील भारतीय दुतवासासमोर 26 जानेवारीला केलेल्या आंदोलनावेळी केले होते. त्यात शेतकरी आंदोलन संपले तरी स्वतंत्र पंजाब देशासाठी लढा सुरु राहील, असे तो म्हणत आहे.
ग्रीटा थनबर्गला आंदोलन भडकविण्यासाठी दिलेले टूल किट हे खलिस्तानवादी चळवळ अधिक रुजविण्यासाठीच होती, हे आता अधिकच स्पष्ट झाले आहे. थनबर्गला दिलेले टूल किटचा भांडाफोड झाल्यावर आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर खलिस्तानवाद्यांचे मनसुबे अधिकच उघड झाले आहेत.
दरम्यान, शेतकरी आंदोलच्या मागून खलिस्तानवादी चळवळ रुजविण्याचे षडयंत्र राचले आहे, असा गौप्यस्फोट एका तपासी अधिकाऱ्याने केला आहे. धालीवाल याचा व्हिडीओ आता हेच सांगत आहे.