औरंगाबादमध्ये शिवसेना Vs शिवसेना : जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने खैरेंची अंबादास दानवेंवर कुरघोडी! दानवेंना डावलून काँग्रेस पॅनलला दिला पाठिंबा

Khaire Vs Danve: Ex MP Chandrakant Khaire Declaires support Of Shivsena to panel of Congress leaders in District Bank Election

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होऊ घातली आहे. जिल्हा बँकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गजांनी शड्डू ठोकले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांच्याशी चर्चा न करताच निर्णय घेतल्याने हा वाद उफाळला आहे. Khaire Vs Danve: Ex MP Chandrakant Khaire Declaires support Of Shivsena to panel of Congress leaders in District Bank Election


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होऊ घातली आहे. जिल्हा बँकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गजांनी शड्डू ठोकले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांच्याशी चर्चा न करताच निर्णय घेतल्याने हा वाद उफाळला आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक अखेरच्या टप्प्यात आहे. शुक्रवारी सायंकाळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेते डॉ. कल्याण काळे व सुभाष झांबड यांच्या नेतृत्वातील शेतकरी सहकार बँक विकास पॅनलला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. हा पाठिंबा खैरे म्हणून नव्हे तर शिवसेना म्हणून असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान, अंबादास दानवेंच्या नाराजीवर पत्रकारांनी विचारताच कोण अंबादास दानवे? त्यांचे नाव घेऊन मला तोंड खराब करायचे नाही, असे म्हणत त्यांनी दानवेंवरील राग व्यक्त केला.खैरे पुढे म्हणाले की, हरिभाऊ बागडेंना बँक ताब्यात घ्यायची आहे. आता त्यांचं वय झालंय. त्यांनी शांत बसावं. लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधीत्व कराव. त्यांचं बँकेत खरंच काय काम आहे? पत्रकारांनी तुमचा राग हरिभाऊंवर आहे की दानवेंवर असे विचारताच क्षणाचाही विलंब न करता ते म्हणाले की, कोण आहे अंबादास दानवे?

दरम्यान, शिवसेनेत चंदक्रांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे हा वाद अनेकदा उफाळून आला आहे. आता जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने हा वाद पुन्हा एकदा समोर आला. चंद्रकांत खैरे यांनी मंत्री संदिपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता त्यांच्यावरही टीका केली. या पत्रकार परिषदेवेळी सुभाष झांबड, अंबादास मानकापे, किरण पा. डोणगावकर, नंदकुमार घोडेले, नामदेव पवार, जगन्नाथ काळे, पवन डोंगरे, पद्माकर इंगळे आदींची उपस्थिती होती.

Khaire Vs Danve: Ex MP Chandrakant Khaire Declaires support Of Shivsena to panel of Congress leaders in District Bank Election

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती