खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाला मुहूर्त मिळेना; प्रवेशाबाबत नुसतेच दावे-प्रतिदावे

  • राष्ट्रवादीत खडसेंना मिळणार मोठी जबाबदारी; उदेसिंह तडवींचा दावा

विशेष प्रतिनिधी

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला मुहूर्तच मिळेना. त्यांच्या प्रवेशाबाबत नुसतेच दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला काही माहीत नाही म्हणून हात झटकले, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाथाभाऊंना राजकारण चांगले कळते ते योग्य निर्णय घेतील, असा सूचक इशारा देऊन खडसेंची राष्ट्रवादीकडे निघालेली वाटचाल रोखण्याचा प्रयत्न केले असे मानले जात आहे. स्वतः खडसेंनी मुहूर्त सगळे तुमचेच आहेत असे पत्रकारांना सांगून यांच्यावरच गुगली टाकली.

एवढे असूनही राष्ट्रवादीत भाजपाचे नाराज एकनाथ खडसे हे घटस्थापनेच्या दिवशी जाणार असल्याचे जवळ जवळ निश्चित मानले जात आहे. त्यांना राष्ट्रवादीत आमदार पदासोबत महत्वाचे स्थान देखील मिळण्याची शक्यता असल्याचा दावा नंदुरबाचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी एका वाहिनीला मुलाखत देतांना केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खडसे येत असल्याचे उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या गटात कमालीची उत्सुकता आता दिसू लागली आहे.

पाडवी म्हणाले की मी नाथाभाऊंची काही महिन्यापूर्वी भेट झाली असता मला त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मी भाजप सोडून ९ सप्टेंबरला राष्ट्रवादीत सल्ल्यानुसार गेले होते. काही दिवसांपूर्वी मुंबई येथे शरद पवारांनी खडसेंच्या प्रवेशाची चाचपणी बाबत बैठकी घेतली होती. त्यानंतर खडसे-पवार यांची भेटीबाबत चर्चा होती. त्यानुसार खडसे मुंबई वरून परत आल्यावर मी त्यांना भेटलो.

साहेब तुम्ही मुंबईवरून आलात तर काही आनंदाची बातमी आणली का असा प्रश्न मी विचारला. तेव्हा खडसेंनी चेहऱ्यावर स्मिथ हास्य देत सर्व पॉझिटिव्ह चर्चा झाली आहे. सर्व उहापोह झालेला असून येत्या आठ दिवसात आपण प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*