राममंदिर निधी संकलनात कॉंग्रेसप्रमाणे गैरव्यवहार होणार नाही याची सामान्यांना खात्री, केशव उपाध्ये यांचा टोला


ज्या काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी जामीनावर आहे, अशा पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांना सगळीकडे गैरव्यवहारच दिसत असणार. राममंदिराचा निधी नॅशनल हेराल्डप्रमाणे अन्यत्र वळविला जाणार नाही, याची सामान्य माणसाला खात्री आहे, असा टोला केशव उपाध्ये पत्रकातून लगावला. Keshav Upadhyay ensure that the Ram temple fund collection will not be misused as in congress


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ज्या काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी जामिनावर आहे, अशा पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांना सगळीकडे गैरव्यवहारच दिसत असणार. राममंदिराचा निधी नॅशनल हेराल्डप्रमाणे अन्यत्र वळविला जाणार नाही, याची सामान्य माणसाला खात्री आहे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये पत्रकातून लगावला.

उपाध्ये म्हणाले की, आपण देत असलेला निधी योग्य ठिकाणी पोहोचणार आहे याची सामान्य माणसाला खात्री आहे. म्हणूनच सामान्य माणसांकडून राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला जात आहे. त्यामुळे मतांसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसने राममंदिराच्या निधीची उठाठेव करू नये, असा टोलाही उपाध्ये यांनी काँग्रेसला लगावला.



काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राममंदिर निधी संकलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर शंका घेतली. तसेच, हा निधी योग्य ठिकाणीच जाईल याची राज्य सरकारने काळजी घ्यावी अशी मागणी केली. त्यावर भाजपाकडून उत्तर देण्यात आले. उपाध्ये म्हणाले की, राममंदिरासाठी सामान्य माणूस स्वत:हून निधी देऊ लागल्याने काँग्रेसी मंडळींचा पोटशूळ झाला आहे.

त्यामुळेच निधी योग्य ठिकाणी जातोय की नाही याची चिंता काँग्रेसवाल्यांना वाटू लागली आहे. राममंदिरासाठी होत असलेले निधी संकलन पूर्णत: पारदर्शक पद्धतीने होत आहे. निधी संकलन करणारे कार्यकर्ते त्याची पावती त्वरित निधी देणाऱ्याकडे सुपूर्द करत आहेत. निधी संकलन करणाऱ्या संघटनांवर विश्वास असल्यानेच गोरगरिबही निधी संकलनास हातभार लावत आहेत.

अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवर राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. पण या ट्रस्टबरोबरच भाजपा व आरएसएसदेखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता.

Keshav Upadhyay ensure that the Ram temple fund collection will not be misused as in congress

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती