केरळमध्ये कम्युनिस्ट केडरच्या सरकारी नोकरभरतीला विरोध करणाऱ्या काँग्रेस आंदोलकांवर डाव्या सरकारचा वॉटर कॅननचा मारा


वृत्तसंस्था

तिरूअनंतपूरम : केंद्रात, पश्चिम बंगालमध्ये आणि अन्य राज्यांमध्ये राजकीय चुंबाचुंबी करणाऱ्या काँग्रेस आणि डाव्या पक्षांमध्ये केरळात मात्र राजकीय हिंसाचार सुरू आहे. केरळच्या डाव्या पक्षांच्या पिनरई विजयन सरकारने काँग्रेसच्या आंदोलक कार्यकर्त्यांवर वॉटर कॅनन आणि ग्रेनेडचा मारा केला आहे. हे आंदोलक डाव्या सरकारने मागच्या दाराने सरकारी नोकरभरती केली त्याला विरोध करीत होते. या नियमबाह्य नोकरभरतीत मार्क्सवादी कम्युनिस्टांच्या केडरला प्राधान्य देऊन हजारो नियुक्त्या केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे  Kerala Police use water cannon, teargas & grenade on Youth Congress workers demonstrating

केरळात विधानसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. राज्यातला डाव्या पक्षांचा प्रभाव टिकून राहावा या हेतूने केपीएससी अर्थात केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशनमधून अपेक्षित असलेल्या हजारो नेमणूका पिनराई विजयन सरकारने मार्क्सवादी केडरच्या कार्यकर्त्यांना किंवा डाव्या आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या करवून घेतल्यात.त्याला काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचा ठाम विरोध आहे. मात्र, आचारसंहिता लागू नाही. त्यामुळे डाव्या सरकारने सरकारी नोकरभरतीचा आणि कॉन्ट्रॅक्ट नोकरभरतीचा आणि कॉन्ट्रॅक्ट नोकरांना नोकरीत कायमची भरती देण्याचा सपाटा लावला आहे.

अनेक ठिकाणी दुप्पट जागा काढून नोकरभरती केली आहे. डाव्या केडरचा कार्यकर्ता हा एकमेव निकष लावल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. या नोकरभरतीला काँग्रेस कार्यकर्ते एकत्र येऊन विरोध करीत होते. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅनन आणि ग्रेनेडचा त्यांच्यावर मारा केला.

Kerala Police use water cannon, teargas & grenade on Youth Congress workers demonstrating

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था