केरळमधील सोनेतस्करीचे मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत धागेदोरे, एनआयए करणार तपास


वृत्तसंस्था

कोची : केरळच्या त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका डिप्लोमॅटिक बॅगेजमधून ३० किलो सोने जप्त करण्याच्या प्रकरणाचे धागेदोरे मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत असल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आता या प्रकरणाचा तपास करणार आहे. त्यामुळे केरळच्या राजकारणात भूकंप झाला आहे.

तस्करीच्या रॅकेटमधील मुख्य संशयित स्वप्ना सुरेश ही राज्यातील सत्ताधारी माकपच्या डाव्या लोकशाही आघाडी सरकारची निकटवर्ती मानली जाते. धक्कादायक म्हणजे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या आयटी सचिवांची निकटवर्तीयही आहे. सरकारने मुख्य सचिव एम शिवशंकर यांना पदावरून हटवले आहे. केरळचे मुख्यमंत्र्यांसोबत स्वप्ना सुरेश अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वावरताना दिसली आहे. तसेच त्यांच्या खासगी वर्तुळातही तिचा वावर असल्याचे सांगितले जात आहे.

केरळच्या आयकर विभागासोबत काम करणारी हाय फ्रोफाइल कन्सल्टंट स्वप्ना सुरेश या महिलेचे सोने तस्करी प्रकरणात नाव आहे. संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) काम करत असलेल्या मोठ्या तस्करांशी या रॅकेटचा संबंध आहे. कोट्यवधींच्या या सोने तस्करी रॅकेट प्रकरणातून मालामाल झालेल्यांची नावं शोधण्यात येत आहेत. सोने तस्करी प्रकरणात स्वप्ना सुरेश या महिलेचे नाव आल्यानंतर भाजपने सरकारला लक्ष्य केलं आहे.

आयटी सचिव आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या कार्यालयाने या प्रकरणातून स्वप्ना सुरेश नाव हटवण्यासाठी दबाव आणला. केरळचे आयटी सचिव स्वप्ना सुरेशची पाठराखण करत आहेत. ही महिला सत्तेतील अनेकांच्या संपर्कात होती असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी केला.

आयटी सचिव हे मुख्यमंत्र्यांचेही सचिव आहेत. स्वप्ना सुरेशच्या निवासस्थानी त्यांचं येणं-जाणं आहे, असा आरोप भाजपने केलाय. स्वप्ना सुरेशचा जन्म अबू धाबीत झाला आणि तेथेल लहानाची मोठी झाली. २०११ मध्ये ती तिरुवनंतपूरममधील एका पर्यटन कंपनीत कामाला लागली. दोन वषार्नंतर ती एअर इंडियाच्या एसएटीएसमध्ये गेली.

पण २०१६ मध्ये तिने नोकरी सोडली आणि अबू धाबीला गेली. तिच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल झाली होती. सोने तस्करीसाठी ती कधीपासून डिप्लोमॅटिक चॅनेलचा बॅगेजसाठी उपयोग करत होती हे अजून स्पष्ट झालेले नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था