Kerala Assembly Elections Former Congress Leader PC Chacko joined NCP in the presence of Sharad Pawar

Kerala Assembly Elections : शरद पवारांच्या उपस्थितीत पीसी चाकोंचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, नुकताच कॉंग्रेसचा दिला होता राजीनामा

कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर पीसी चाको यांनी मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पीसी चाको यांचे पक्षाचे सदस्यत्व दिले. शरद पवार म्हणाले की, केरळच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की, पीसी चाको राष्ट्रवादीत दाखल झाल्याने खूप आनंद झाला आहे. ते प्रचारासाठी खूप उपयुक्त ठरतील. Kerala Assembly Elections Former Congress Leader PC Chacko joined NCP in the presence of Sharad Pawar


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर पीसी चाको यांनी मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पीसी चाको यांचे पक्षाचे सदस्यत्व दिले. शरद पवार म्हणाले की, केरळच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की, पीसी चाको राष्ट्रवादीत दाखल झाल्याने खूप आनंद झाला आहे. ते प्रचारासाठी खूप उपयुक्त ठरतील.

तत्पूर्वी, पीसी चाको यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. चाको म्हणाले की, केरळमधील राष्ट्रवादी पक्ष डाव्या लोकशाही आघाडीचा (एलडीएफ) भाग आहे. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर पुन्हा एकदा मी एलडीएफमध्ये परतलो आहे.

पीसी चाको म्हणाले, “मी आज अधिकृतपणे राष्ट्रवादीत सामील होत आहे. गेल्या 40 वर्षांपासून राष्ट्रवादी केरळमधील एलडीएफचा भाग आहे. राष्ट्रवादीच्या वतीने मी एलडीएफमध्ये परत आल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.”दरम्यान, निवडणुका होऊ घातलेल्या केरळमध्ये 10 मार्च रोजी ज्येष्ठ नेते पी.सी. चाको यांनी कॉंग्रेसला धक्का देत राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार निश्चित करण्यातील गटबाजी हे यामागचे कारण होते. केरळमध्ये 6 एप्रिलला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची निवड दोन गटांनी अलोकशाही पद्धतीने केल्याचा आरोप त्यांनी केला होता. पीसी चाको हे तब्बल पाच दशकांपासून कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. पीसी चाको हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, ते कॉंग्रेस सरकारमध्ये मंत्रीही राहिलेले आहेत. चाको हे 2009 ते 2014 पर्यंत केरळमधील थ्रिसूरचे खासदार होते.

6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात केरळच्या 140 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. राज्यात सध्या पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वातील एलडीएफचे सरकार आहे.

Kerala Assembly Elections Former Congress Leader PC Chacko joined NCP in the presence of Sharad Pawar

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*