Kendriya Vidyalayas will not have teacher recruitment this year says Union Education Minister Ramesh Pokhriyal

Teacher Recruitment : केंद्रीय विद्यालयांत या वर्षी नाही होणार शिक्षक भरती, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केले स्पष्ट

गतवर्षी कोरोना विषाणूमुळे सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आल्या होत्या, त्यामुळे केंद्रीय शाळांमध्ये अद्याप नवीन शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) झालेली नाही. आता शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, यावर्षीही नवीन शिक्षकांची भरती होणार नाही. सध्या केंद्रीय विद्यालयात 40,662 शिक्षक आहेत, तर जवाहर नवोदय विद्यालयात 11,808 शिक्षक आहेत. Kendriya Vidyalayas will not have teacher recruitment this year says Union Education Minister Ramesh Pokhriyal


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गतवर्षी कोरोना विषाणूमुळे सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आल्या होत्या, त्यामुळे केंद्रीय शाळांमध्ये अद्याप नवीन शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) झालेली नाही. आता शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, यावर्षीही नवीन शिक्षकांची भरती होणार नाही. सध्या केंद्रीय विद्यालयात 40,662 शिक्षक आहेत, तर जवाहर नवोदय विद्यालयात 11,808 शिक्षक आहेत. शिक्षणमंत्र्यांनी लेखी उत्तरात कनिष्ठ सभागृहाला माहिती दिली आहे. शिक्षणमंत्री पोखरीयाल यांच्या विधानामुळे केंद्रीय विद्यालयातील शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. आता त्यांना भरतीसाठी आणखी वर्षभराची प्रतीक्षा करावी लागेल.शिक्षणमंत्र्यांचे निवेदन

शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल म्हणाले की, नवीन केंद्रीय विद्यालय उघडण्याच्या प्रस्तावाचा विचार तेव्हाच केला जाईल जेव्हा भारत सरकार, राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक हे विभागांना वचनबद्ध असतील. ते म्हणाले की, केव्हीएसच्या नियमांनुसार नवीन केंद्रीय विद्यालय उघडण्यासाठी जमीन, तात्पुरती राहण्याची व्यवस्था यासह अनेक सुविधा आवश्यक आहेत.

दरम्यान, 31 मे 2014 रोजी देशातील सर्व जिल्ह्यांत जवाहर नवोदय विद्यालय उघडण्यास मान्यता देण्यात आली होती, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले, परंतु अद्याप नवोदय विद्यालय योजना स्वीकारली गेलेली नाही, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

Kendriya Vidyalayas will not have teacher recruitment this year says Union Education Minister Ramesh Pokhriyal

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*