केंद्र सरकारच्या बळामुळे देशात १ कोटींपेक्षा जास्त चाचण्या


चीनी व्हायरसच्या उपाययोजनेत टेस्ट, ट्रेस आणि ट्रिट म्हणजे चाचण्या, संपर्कशोध आणि उपचार या त्रिसूत्रीवर भर दिला जात आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना यासाठी बळ दिल्याने देशातील चाचण्यांची संख्या एक कोटींपेक्षा जास्त झाली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या उपाययोजनेत टेस्ट, ट्रेस आणि ट्रिट म्हणजे चाचण्या, संपर्कशोध आणि उपचार या त्रिसूत्रीवर भर दिला जात आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना यासाठी बळ दिल्याने देशातील चाचण्यांची संख्या एक कोटींपेक्षा जास्त झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात 3 लाख 46 हजार 459 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत करण्यात आलेल्या एकूण चाचण्यांची संख्या आता 1 कोटी 1 लाख 35 हजार 525 इतकी झाली आहे.

देशभरात चाचण्यांसाठीच्या प्रयोगशाळांची संख्या सातत्याने वाढवण्याचा देखील केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. आजपर्यंत देशात कोविडसाठी एकूण 1105 प्रयोगशाळांची व्यवस्था करण्यात आली आहे. यातल्या 788 प्रयोगशाळा सरकारी असून 317 प्रयोगशाळा खाजगी आहेत. देशातील रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर आता कमी झाला आहे. राष्ट्रीय स्तरावर हा सरासरी दर आता 6.73 टक्के इतका आहे.

दिल्लीत दररोज केवळ 5481 चाचण्या (1 ते 5 जून दरम्यान) केल्या जात होत्या. केंद्र सरकारच्या या सुनियोजित प्रयत्नांमुळे त्यांच्यात नंतर लक्षणीय वाढ होऊन, आता एक महिन्यानंतर, म्हणजेच 1 ते 5 जुलै या दरम्यान दररोज सरासरी 18,766 चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊनही, दिल्लीतील रुग्ण पॉझिटिव्ह निघण्याचा दर मात्र कमी झाला असून गेल्या तीन आठवड्यात हा दर 30 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था