‘केम छो वरली’ ते ‘उध्दव आपडा’; शिवसेनेचा ‘धर्मनिरपेक्ष’ प्रवास; हेमराज शहांकडे संयोजन दिले त्यातच ‘सगळे आले’

हेमराज शहा हे शिवसेनेसाठी केम छो वरली आणि जलेबी – फाफडा – उध्दव आपडा पुरते मर्यादित नाहीत… हिंदुत्ववादी शिवसेना ते धर्मनिरपेक्ष शिवसेना या वळणावरचा माइलस्टोन आहेत… हे या निमित्ताने समजले तरी पुरेसे आहे.  Kem Cho Worli to Uddhav Apada; Shiv Senas secular journey; Hemraj Shah was given a Management of all came


विनायक ढेरे

मुंबई । आदित्य ठाकरेंच्या प्रचारात “केम छो वरली”चे फ्लेक्स लागले आणि शिवसेनेने गुजराती रस्ता पकडल्याचे स्पष्ट झाले होते… पण त्यावेळी भाजप बरोबर होता, म्हणून त्यावेळी धकून गेले. भाजपलाही शिवसेनेच्या गुजरात प्रेमाच्या उकळ्या फुटल्या होत्या.

पण आता शिवसेनेच्या गुजराती प्रेमाचा प्रवासाची गाडी धर्मनिरपेक्ष रस्त्यावरून वेग घेतीय… शिवसेनेच्या १० तारखेच्या गुजराती मेळाव्याच्या संयोजनाची सूत्रे हेमराज शहांना दिलीत यातच “सगळे राजकीय इंगित आले” आहे… हेच ते हेमराज शहा आहेत, ज्यांनी राजीव गांधी आणि शरद पवार यांच्यासमवेत बराच काळ काम केलेले आहे. आता ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर काम करत आहेत… ही माहिती कुठल्या रॉकेट सायन्समधून पैदा करावी लागलेली नाही, तर ती त्यांनी स्वतःच दिली आहे… आणि अशा वेळेला दिली आहे, की मुंबईकरांना शिवसेनेच्या गुजराती मेळाव्याचे इंगित कळून यावे.माध्यमांशी बोलताना ज्या सहजतेने शिवसेनेच्या धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख हेमराज शहांनी केला, ते ज्या पध्दतीने मेळावा संयोजनात पुढाकार घेत आहेत, त्यात त्यांची बॉडी लँग्वेज सगळे काही सांगून जाते आहे… शिवसेनेतले नवे सत्ता संतुलन आणि त्याच्या राजकीय लिव्हर्स आता कोणाच्या हातात गेल्यात, हेही सांगून जाते आहे… ज्या राजीव गांधींना सुरवातीच्या काळात राजकारणात पाय रोवताना मोजक्या मंडळींनी मदत केली, त्यात हेमराज शहांचे नाव वरती होते. शरद पवारांशी १९९० च्या दशकात त्यांची जवळीक होती. मुंबईतले “बरेचसे संयोजन” ते करीत होते.

आता हेमराज शहा हे शिवसेनेचे राष्ट्रीय संयोजक बनले आहेत… शिवसेनेचा हा राजकीय प्रवास बरेच काही सांगू इच्छितो आहे… एखाद्या पक्षाचे काँग्रेसीकरण होते म्हणजे काय हे स्पष्ट करतो आहे. त्यातल्या राजकीय सत्तेच्या लिव्हर्स, पुर्जे नेमके कुठे आहेत… ते कोण आहेत, यांचे अंतरंग उलगडून दाखवतो आहे.

Kem Cho Worli to Uddhav Apada; Shiv Senas secular journey; Hemraj Shah was given a Management of all came

हेमराज शहा हे शिवसेनेसाठी केम छो वरली आणि जलेबी – फाफडा – उध्दव आपडा पुरते मर्यादित नाहीत… हिंदुत्ववादी शिवसेना ते धर्मनिरपेक्ष शिवसेना या वळणावरचा माइलस्टोन आहेत… हे या निमित्ताने समजले तरी पुरेसे आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*