कमांडो बदलले अन केजरीवाल यांनी केला सुरक्षा काढून घेतल्याचा कांगावा

प्रशासकीय सोईसाठी कमांडो बदलले आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरक्षा काढून घेतल्याचा कांगावा सुरू केला आहे. Kejriwal’s drama, Pretending of removal of security only after changing Commando


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : प्रशासकीय सोईसाठी कमांडो बदलले आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरक्षा काढून घेतल्याचा कांगावा सुरू केला आहे.
अरविंद केजरीवाल यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याचा दावा, दिल्लीतील आम आदमी पार्टीने केला आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्रालयाने हा आरोप फेटाळला आहे.

दिल्लीचे पोलीस सह-आयुक्त आय. डी. शुक्ला यांनी सांगितले की, केजरीवाल यांना झेड प्लस सुरक्षा असून ती कायम आहे. गुजरातमधील सुरत महापालिकेच्या निवडणुकीत ‘आप’ने लक्षणीय कामगिरी केल्यानंतर आणि केजरीवाल यांच्या सुरतमध्ये आयोजित रोड-शोच्या आदल्या दिवशी भाजपच्या नेतृत्वाच्या इशाऱ्यावरुन हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप आपने केला आहे.त्यांच्या सुरक्षेतील कमांडोंची संख्या सहावरून कमी करून दोन करण्यात आल्याचा आरोप आहे. तथापि, असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रशासकीय कारणांमुळे सहापैकी चार कमांडो बदलण्यात आले आहे. ही नियमित प्रक्रिया असते, असे पोलिसांनी सांगितले.

आम आदमी पाटीर्चे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी अशी मागणी केली की, केंद्राने या तुच्छ निर्णयामागचे कारण स्पष्ट करावे. केंद्र सरकार अशा प्रकारे एखाद्याच्या सुरक्षेबाबत समझोता करू शकते? हे खेदजनक आहे. मात्र केजरीवाल आणि कंपनीचा हा निव्वळ कांगावा असल्याचे गृह मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानंतर उजेडात आले आहे.

Kejriwal drama Pretending of removal of security only after changing Commando

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*