सीता हर युग में अग्निपरीक्षा नही देगी; ‘करूणा धनंजय मुंडें’ची फेसबुक पोस्ट; मुंडेंशी संघर्षाचा पवित्रा!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मासोबतच्या संबंधांची जाहीर कबुली दिल्यानंतर करूणा धनंजय मुंडे यांनी “सीता हर युग में अग्निपरीक्षा नही देगी,” अशी फेकबुक पोस्ट लिहून मुंडे यांच्याविरोधातील संघर्ष पुढे नेण्याचीच एक प्रकारे घोषणा केली आहे. Karuna Dhananjay Munde Facebook post The sanctity of the struggle with Munde

एवढेच नाही, तर करूणा धनंजय मुंडे यांनी त्याच वेळी “सत्य स्वयम् साबित होता है”, अशीही फेसबुक पोस्ट करून एक प्रकारे धनंजय मुंडे यांना आव्हानच दिले आहे.


धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्या ,भाजपचा मुख्यमंत्र्यांना इशारा


वरील दोन्ही फेसबुक पोस्ट धनंजय मुंडे यांचे प्रकरण बाहेर आल्यानंतरच्या आहेत. त्याच्याही आधी याच करूणा धनंजय मुंडे यांनी १० जानेवारीला रात्री १०.५४ वाजता फेसबुकवर ही पोस्ट टाकून धनंजय मुंडे यांना आव्हानच दिले आहे.

ही पोस्ट अशी –

जिंदगी में कभी भी
किसी को कम मत समझो,
पूरी दुनिया को डुबोने की
ताकत रखने वाला समंदर
तेल की एक बूंद को नहीं डूबो सकता।

या पोस्ट नंतरच करूणा धनंजय मुंडे यांची बहीण रेणू शर्मा हिने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आणि अत्याचाराचे गंभीर आरोप केले. त्यानंतर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा हिची ओळख नसल्याचा किंवा काहीही संबंध नसल्याचा दावा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला नाहीच.

उलट रेणूची बहीण करूणा शर्मा हिच्याशी २००३ पासून एकमेकांच्या संमतीने संबंध होते. या संबंधांमधून एक मुलगा, एक मुलगी असल्याची कबुली सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून दिली आहे. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Karuna Dhananjay Munde Facebook post The sanctity of the struggle with Munde

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती