Kangana's strong response to pop star Rihanna who tweeted about farmers protest

शेतकरी आंदोलनावर ट्वीट करणाऱ्या पॉप स्टार रिहानावर कंगनाचा जोरदार पलटवार, म्हणाली…

आंदोलन करणारे शेतकरी केवळ शेतकरी नेत्यांच्या दुराग्रहामुळे कठीण परिस्थितीतून जात आहेत. आता आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पॉप गायिका रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यावर बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने पलटवार केला असून आंदोलकांना मूर्ख संबोधले आहे. Kangana’s strong response to pop star Rihanna who tweeted about farmers protest


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली आणि दिल्लीच्या सीमा भागात मागच्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, दुसरीकडे सरकारही ठाम आहे. या दोघांमधील 10 वेळा चर्चा झाली आहे, परंतु शेतकरी नेते ऐकून घेण्याच्या स्थितीत नाहीत. देशात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात राजकारण सुरू आहे. आता या आंदोलनाची चर्चा सातासमुद्रापार सुरू झाली आहे. अमेरिकेची प्रसिद्ध पॉप गायिका रिहानानेही शेतकरी आंदोलनाला समर्थन करणारे ट्विट केले आहे. ट्वीटमध्ये ती म्हणाली की, याबाबत आपण बोलत का नाहीत?

आंदोलन करणारे शेतकरी केवळ शेतकरी नेत्यांच्या दुराग्रहामुळे कठीण परिस्थितीतून जात आहेत. आता आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पॉप गायिका रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यावर बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने पलटवार केला असून आंदोलकांना मूर्ख संबोधले आहे.अमेरिकन पॉप सिंगर रिहानाने ट्विटरवरून भारतात सुरू असलेल्या शेतकरी चळवळीविषयी एक बातमी शेअर केली आहे. रिहानाने ही बातमी #FarmersProtest बरोबर ट्वीट केली आणि लिहिले की, आपण याबद्दल का बोलत नाही?


दरम्यान, बातमीमध्ये भारतातील हरियाणामधील अनेक जिल्ह्यांमध्ये बंदी घातलेल्या इंटरनेट सेवेचा उल्लेख होता. यानंतर या ट्विटला उत्तर देताना बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने तिच्यावर तिखट शब्दांत हल्ला चढवला.

Kangana’s strong response to pop star Rihanna who tweeted about farmers protest

अमेरिकन पॉपस्टार रिहानाच्या या ट्विटला बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत चोख प्रत्युत्तर दिले. कंगना म्हणाली की, कोणीही याबद्दल बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत तर भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न करणारे दहशतवादी आहेत. जेणेकरून चीनसारखे देश आमच्या देशाचा ताबा घेतील आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवतील. तू शांत बैस, मूर्ख! आम्ही तुमच्यासारखे मूर्ख नाही, जे आपला देश विकतील.

Kangana's strong response to pop star Rihanna who tweeted about farmers protest

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*