दिल्लीत आग लावून स्वत: लोकल क्रांतीकारी परदेशात थंडीची मजा घेतोय, कंगनाचा दिलजीत दोसांझवर निशाणा

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या अभिनेता दिलजीत दोसांझने परदेशातील पर्यटनाची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर अभिनेत्री कंगना रनौटने चांगलेच सुनावले आहे. दिल्लीत आग लावून हा लोकल क्रांतीकारी स्वत: परदेशात थंडीची मजा घेतोय, अशी टीका कंगनाने केली आहे. Kangana Ranaut targets Diljit Dosanjh over farmer protest


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या अभिनेता दिलजीत दोसांझने परदेशातील पर्यटनाची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर अभिनेत्री कंगना रनौटने चांगलेच सुनावले आहे. दिल्लीत आग लावून हा लोकल क्रांतीकारी स्वत: परदेशात थंडीची मजा घेतोय, अशी टीका कंगनाने केली आहे.

अभिनेता दिलजीत दोसांझ याने आपली काही छायाचित्रे शेअर केली आहेत. यामध्ये बर्फाने आच्छादित वातावरणात दिलजीतने पोझ दिल्या आहेत. त्याची ही पोस्ट शेअर करत कंगनाने म्हटले आहे की, वाह ब्रदर, देशात आग लावून, शेतकऱ्यांना रस्त्यावर बसवून लोकल क्रांतीकारी विदेशात थंडीची मजा घेत आहे. वाह, याला म्हणतात लोकल क्रांतीकारी.दिलजीतनं शेतकऱ्यांमध्ये जाऊन, एकजुटीनं लढण्याचा संदेश ट्विटरवरून शेअर केला होता. याच ट्विटला उत्तर देताना अभिनेत्री प्रियांका चोप्रानं शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लवकर लक्ष दिलं पाहिजे, असं ट्विट केलं होतं. प्रियांकानं ट्विटमध्ये म्हटलं की, आमचे शेतकरी भारताचे अन्न सैनिक आहेत. त्यांची भीती कमी करण्याची गरज आहे. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होणे आवश्यक आहे. एक मजबूत लोकशाही म्हणून आपण हे सुनिश्चित केलं पाहिजे की लवकरात लवकर हे संकट दूर होईल.

यावरून दोघांना सुनावताना कंगना म्हणाली होती, प्रिय दिलजीत आणि प्रियांका…तुम्हाला खरंच शेतकऱ्यांबद्दल कळवळा असेल किंवा तुम्ही तुमच्या आईचा आदर करत असाल तर हा कृषी कायदा नक्की काय आहे ते एकदा जाणून घ्या. तुम्हाला शेतकऱ्यांचा वापर करून देशद्रोह्यांच्या गुड बुक्समध्ये यायचं आहे का?

Kangana Ranaut targets Diljit Dosanjh over farmer protest

दिलजीतने या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना १ कोटी रुपायांची मदत केली होती. या पैशातून त्याने शेतकऱ्यांना स्वेटर व चादरी पुरविल्या होत्या. काही लोक आंदोलनाच्या नावाखाली हिंदू-शीख असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा मुद्दा फक्त शेतकऱ्याचा आहे. यात धर्माचा कोणताच विषय किंवा मुद्दा नाहीये. कोणताही धर्म कधीच वाद करण्यासाठी सांगत नाही, असेही म्हटले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*