मी हरामखोर नव्हे तर देशभक्त : राजपुती रक्त खवळले ; लेटर बॉंब नंतर कंगनाचे सेनेवर ‘बाण’

  • पालिकेनं घर पाडल्यानंतर मी रडले होते .कंगनाने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

  • ठाकरे सरकारवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कंगनाने शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले. Kangana Ranaut slams Shivsena after Parambir singh letter bomb

विशेष प्रतिनिधी

मुंबई: गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर ठाकरे सरकारवर सर्वच तुटून पडले आहेत. यामध्ये आता अभिनेत्री कंगना रानौतनेदेखील उडी घेतली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कंगनाने शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले. मी खरी देशभक्त आहे, हरामखोर नव्हे, असे सांगत कंगनाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर पलटवार केला.कंगनाने ट्विट करून या सगळ्या प्रकरणावर भाष्य केले आहे. येत्या काही दिवसांत ठाकरे सरकार पूर्णपणे उघडे पडेल. माझे आरोप खरे ठरले. त्यामुळे माझ्या धमन्यांमध्ये राजपुतांचे रक्त असून माझा प्रामाणिकपणा आणि मातृभूमीविषयीची निष्ठा सिद्ध झाली आहे. मी देशभक्त आहे हरामखोर नव्हे, असे कंगनाने म्हटले.

महाराष्ट्र सरकार भ्रष्ट आणि सडलेली राजवट असल्याचा आरोप केला तेव्हा अनेकजण माझ्यावर तुटून पडले. मला शिव्या, धमक्या आणि टीकेला सामोरे जावे लागले. तेव्हा मी प्रतिकारही केला. मात्र, जेव्हा मुंबई शहरावरील माझ्या निष्ठेविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले, पालिकेने अनधिकृतपणे माझे घर उद्ध्वस्त केले, तेव्हा मी रडले होते, असे कंगनाने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Kangana Ranaut slams Shivsena after Parambir singh letter bomb

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*