दिल्लीतील हिंसा आणि शाहीन बाग आंदोलन भडकाविण्यासाठी पैसा मिळाला होता, तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांना कंगना रनौटचा सवाल


कर चोरीच नाही तर काळ्या पैशाचाही मोठा व्यवहार झाला आहे. त्यांना हा पैसा प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेली हिंसा आणि शाहीन बाग आंदोलनाला भडकवण्यासाठी मिळाला होता का? असा सवाल अभिनेत्री कंगना रनौटने तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांना केला आहे. Kangana Ranaut questions Tapsi Pannu, Anurag Kashyap, whether money was used to incite violence in Delhi and the Shaheen Bagh agitation?


प्रतिनिधी

मुंबई : कर चोरीच नाही तर काळ्या पैशाचाही मोठा व्यवहार झाला आहे. त्यांना हा पैसा प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेली हिंसा आणि शाहीन बाग आंदोलनाला भडकवण्यासाठी मिळाला होता का? असा सवाल अभिनेत्री कंगना रनौटने तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांना केला आहे.

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांची इनकम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरु आहे. सुमारे ६५० कोटी रुपयांची करचोरी केल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर पैशाचा अनधिकृत व्यवहारही झाला आहे. कंगनाने त्यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे की, कर चोरीच नाही तर काळ्या पैशाचाही मोठा व्यवहार झाला आहे, त्यांना हा पैसा प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेली हिंसा आणि शाहीन बाग आंदोलनाला भडकवण्यासाठी मिळाला होता का? हा काळा पैसा कोठून कुठे पाठवण्यात आला याचा हिशोब कोणाकडेही नाही.

तापसी आणि अनुरागच्या घरांवर छापे टाकल्यानंतर सात लॉकर सील करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तपासात 350 कोटींची फसवणूक उघडकीस येऊ शकते. वास्तविक, हे संपूर्ण प्रकरण आयकर चुकवण्याबाबत आहे. या संदर्भात 28 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

आयटी विभागाने फँटम फिल्म्सच्या वार्षिक आयकर विवरण परताव्याची तपासणी केली, तेव्हा थोडी गडबड झाली असल्याचा संशय निर्माण झाल्याने ही संपूर्ण कारवाई चालू करण्यात आली. तपासादरम्यान काही प्रश्नांची उत्तरे योग्यप्रकारे मिळाली नसल्याचीही बातमी आहे, यामुळे या सेलिब्रीटींना आयटी कार्यालयात बोलावून घेऊन विचारपूस केली जाऊ शकते.

Kangana Ranaut questions Tapsi Pannu, Anurag Kashyap, whether money was used to incite violence in Delhi and the Shaheen Bagh agitation?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी