कंगनाच्या टीकेवरून पुन्हा वादंग; कंगनाचे ‘कहीं पे निगाहे, कहीं पे निशाना’


गांधीजींना नेहरूंसारखा कमकुवत मेंदू हवा होता. जेणेकरून ते स्वत: देशाला कंट्रोल आणि चालवू शकतील. ही योजना चांगली होती. मात्र गांधीजींच्या हत्येनंतर जे घडले ती आपत्ती होती, असे मत प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौटने व्यक्त केले. यामुळे कंगनावर टीकेची झोड उठवली जात आहे. (kangana ranaut news)


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गांधीजींना नेहरूंसारखा कमकुवत मेंदू हवा होता. जेणेकरून ते स्वत: देशाला कंट्रोल आणि चालवू शकतील. ही योजना चांगली होती. मात्र गांधीजींच्या हत्येनंतर जे घडले ती आपत्ती होती, असे मत प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौटने व्यक्त केले. यामुळे कंगनावर टीकेची झोड उठवली जात आहे.kangana ranaut news

कंगना रनौटने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. यासोबतच तिने महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी टिपण्णी केली. सरदार पटेल यांनी सोडलेल्या पंतप्रधान पदाबद्दल कंगनाने गांधीजींना दोष दिला. त्याचबरोबर स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानपदासाठी पटेल यांनी केलेल्या तडजोडीबद्दल खेद व्यक्त केला.kangana ranaut news

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गांधीजींच्या आनंदासाठी त्यांनी पहिले पंतप्रधान म्हणून सर्वात पात्र आणि निवडलेले पद नाकारले. कारण गांधीजींना वाटत होते की, नेहरू चांगली इंग्रजी बोलतात. सरदार पटेल यांचे काहीच नुकसान झाले नाही, मात्र देशाला अनेक दशके याचा परिणाम भोगावा लागला आपल्यासाठी जे योग्य आहे ते निर्लज्जपणे हिसकावून घ्यावे.kangana ranaut news

कंगनाने म्हटले आहे की, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली. आपणच आजचा अखंड भारत देणारी व्यक्ती आहात. पण पंतप्रधानपदाशी तडजोड करून तुम्ही तुमचे नेतृत्व व दृष्टिकोन आमच्यापासून दूर घेऊन गेले. आपल्या निर्णयाबद्दल आम्हाला खेद वाटतो.

kangana ranaut news

सरदार पटेल यांना आदरांजली वाहताना कंगनाने पंडित नेहरु यांना लक्ष्य केले. यापुर्वी शिवसेनेला लक्ष्य करताना तिने सावरकरांचा उल्लेख केला होता. महापुरुषांचे उल्लेख करुन राजकीय टीका करणाऱ्या कंगनाची पात्रता मुळात काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था