Kamal Haasan : कमल हासन सर्वात श्रीमंत उमेदवार, तब्बल 176 कोटींची संपत्ती

Kamal Haasan: Kamal Haasan is the richest candidate, with assets worth Rs 176 crore

अभिनेता-राजकारणी कमल हासन (Kamal Haasan) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी (Tamilnadu Assembly Elections 2021) मंगळवारी दक्षिण कोइंबतूर  मतदारसंघातून (Coimbatore South Assembly Constituency) उमेदवारी अर्ज दाखल केला. आपल्या शपथपत्रात त्यांनी तब्बल 176 कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. मक्कल निधी मय्यम पक्षाचे (MNM) संस्थापक आणि प्रमुख कमल हासन (Kamal Haasan) यांनी 45 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची जंगम मालमत्ता जाहीर केली. कमल हासन यांनी आपल्या जंगम मालमत्तेची किंमत 45,09,01,476 कोटी जाहीर केली. यामध्ये बीएमडब्ल्यू 730 एलडी आणि लेक्सस एलएक्स 570 या दोन वाहनांचा समावेश आहे, ज्यांची किंमत 3 कोटी 69 लाख रुपयांहून जास्त आहे. Kamal Haasan: Kamal Haasan is the richest candidate, with assets worth Rs 176 crore


विशेष प्रतिनिधी

कोइंबतूर : अभिनेता-राजकारणी कमल हासन (Kamal Haasan) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी (Tamilnadu Assembly Elections 2021) मंगळवारी दक्षिण कोइंबतूर  मतदारसंघातून (Coimbatore South Assembly Constituency) उमेदवारी अर्ज दाखल केला. आपल्या शपथपत्रात त्यांनी तब्बल 176 कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. मक्कल निधी मय्यम पक्षाचे (MNM) संस्थापक आणि प्रमुख कमल हासन (Kamal Haasan) यांनी 45 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची जंगम मालमत्ता जाहीर केली. कमल हासन यांनी आपल्या जंगम मालमत्तेची किंमत 45,09,01,476 कोटी जाहीर केली. यामध्ये बीएमडब्ल्यू 730 एलडी आणि लेक्सस एलएक्स 570 या दोन वाहनांचा समावेश आहे, ज्यांची किंमत 3 कोटी 69 लाख रुपयांहून जास्त आहे.

याशिवाय त्यांनी व्यावसायिक इमारती आणि शेतजमिनीसह 131 कोटी रुपयांच्या अचल संपत्तीची माहिती दिली. तसेच चेन्नईत दोन निवासी इमारती जाहीर केल्या, त्यांचे एकूण मूल्य 19.5 कोटी रुपये आहे. लंडनमधील अडीच कोटींच्या एकत्रित मालमत्तेची माहितीही त्यांनी दिली आहे. कमल हासन म्हणाले की, त्यांच्यावर 49 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज आहे. तसेच त्यांनी त्यांचा कोणीही जीवनसाथी किंवा आश्रित नसल्याचे सांगितले.कमल हासन यांनी फेब्रुवारी 2018 मध्ये एमएनएमची स्थापना केली, परंतु त्यांनी कोणतीही निवडणूक लढविली नाही. तथापि, 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी तामिळनाडूमध्ये आपले उमेदवार उभे केले होते. त्यांच्या पक्षाला 3.75 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. कमल हासन हे एमएनएमच्या नेतृत्वाखालील तीन पक्षांच्या युतीमधून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत.

दुसरीकडे, एआयएडीएमकेने आपल्या मित्रपक्ष असलेल्या भाजपासाठी कोइंबतूर दक्षिण मतदारसंघ सोडला आहे. कमल हासन यांचा मुकाबला भाजपच्या महिला महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन आणि कॉंग्रेसच्या मौर्य एस. जयकुमार यांच्याशी होणार आहे.

Kamal Haasan: Kamal Haasan is the richest candidate, with assets worth Rs 176 crore

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था