कलैग्नार करुणानिधींची तिसरी पिढी तमिळनाडूच्या राजकारणात, नातू उदयनीधींना तिकीट जाहीर

विशेष प्रतिनिधी

चेन्नई : द्रमुकचे दिवंगत लोकप्रिय नेते व माजी मुख्यमंत्री कलैग्नार उर्फ एम करुणानिधी यांची तिसरी पिढी आता तमिळनाडूच्या राजकारणात पदार्पण करीत आहे.Kalaignar Karunanidhi’s third generation in Tamil Nadu politics, grandson Udayanidhi’s ticket

करुणानिधी यांचे नातू व स्टॅलीन यांचे पुत्र अभिनेते उदयनिधी यांदा प्रथमच निवडणूक रिंगणार उतरत असून तमिळनाडूच्या राजकारणात या नातवाच्या एंट्रीने रंग भरले जातील यात शंका नाहीतमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी १७३ उमेदवारांची नावे शुक्रवारी जाहीर केली. यामध्ये बहुतांश सर्व विद्यमान आमदार व माजी मंत्री यांची वर्णी लागली आहे.

अण्णाद्रमुक व ‘एएमएमके’मधून बाहेर पडून द्रमुकमध्ये प्रवेश केलेल्यांनाही उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.स्टॅलीन हे कोलातूर मतदारसंघातून पुन्हा नशीब अजमावणार आहेत

तर त्यांचे पुत्र व अभिनेते उदयनिधी हे प्रथमच राजकीय आखाड्यात उतरणार असून त्यांना चेपॉक-त्रिपलीकेनमधून तिकीट मिळाले आहे. द्रमुकचे आमदार व माजी मंत्री दुराई मुरुगन, के. एन. नेहरु, के. पोनमुडी आणि एम. आर. के. पनीरसेल्वम यांना पुन्हा उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.

यावेळी स्टॅलिन म्हणाले की ही केवळ उमेदवारांची यादी नसून विजयी होणाऱ्यांची आहे. राज्यात लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी द्रमुक लढा देत असून निवडणूक जिंकण्यासाठी माध्यमांचे सहकार्य हवे आहे.

Kalaignar Karunanidhi’s third generation in Tamil Nadu politics, grandson Udayanidhi’s ticket

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*