के. चंद्रशेखर राव मुलाला वाढदिवसी देणार मुख्यमंत्रीपदाचे गिफ्ट!

वाढदिवसी साधेसुधे नाही तर थेट मुख्यमंत्रीपदाचे गिफ्ट! हा भाग्यवान कोण हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. तर ते तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांचे पुत्र के. टी. रामाराव (केटीआर) आहे. K. Chandrasekhar Rao to give birthday gift to his son as CM!


विशेष प्रतिनिधी

हैद्राबाद : वाढदिवसी साधेसुधे नाही तर थेट मुख्यमंत्रीपदाचे गिफ्ट! हा भाग्यवान कोण हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. तर ते तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांचे पुत्र के. टी. रामाराव (केटीआर) आहे.

वडिलांच्या सरकारात मंत्री असलेले केटीआर २४ जुलैला ४५ वा वाढदिवस साजरा करतील आणि भेट म्हणून वडिलांकडून त्यांना सीएमची खुर्ची मिळू शकते असे म्हटले जात आहे. या काळातच सचिवालय भवनात काम सुरू होईल, यामुळेही शक्यता वाढली आहे. केसीआर यांची ज्योतिष व वास्तूमध्ये श्रद्धा आहे. त्यांच्या वास्तू सल्लागारांनी सांगितले होते की, जुन्या सचिवालयात दोष असल्यानेच त्यांना मुलाला मुख्यमंत्री करता येत नाहीये. यानंतर नव्या सचिवालयाचे बांधकाम सुरू झाले.दुसरीकडे केसीआर यांनी सत्ता हस्तांतरण नाकारले असले तरी राजकीय विश्लेषक आणि त्यांचाच पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीच्या नेत्यांना वाटते की, कधी ना कधी तर ते मुलाला खुर्ची सोपवतील. प्रकृती अस्वास्थ्यामुळे केसीआर सार्वजनिक कार्यक्रमात कमी दिसत आहेत. वेळेवर त्यांनी पक्ष आणि सत्तेचे नेतृत्व मुलाला दिले नाही तर पक्षात फूटही पडू शकते, असे त्यांना वाटते.

नुकताच माहिती – तंत्रज्ञानमंत्री असलेल्या केटीआर यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख विधानसभेचे उपाध्यक्ष पद्मराव गौड यांनी केला होता. २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकांत तेलंगणा राष्ट्र समितीचा विजय झाला. राज्यात सत्तेवर येताना केसीआर यांनी मुलगा केटीआर यांना तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष बनविले. केसीआर यांनी वेगळ्या तेलंगणा राज्यासाठी अनेक वर्षे आंदोलन केले होते.

तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतानाच राव यांनी मुलगा के. टी. रामाराव आणि पुतण्या टी. हरिष राव यांचाही मंत्रीमंडळात समावेश केला होता.

K. Chandrasekhar Rao to give birthday gift to his son as CM!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*