आपल्याच विधानावरून मागे हटण्याची सवय आता बदलली पाहिजे, ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी शरद पवारांचे पत्रच राज्यसभेत वाचून दाखवित दिला सल्ला

कृषी क्षेत्रात खासगी क्षेत्राची भागिदारी गरजेची असून यासाठी बाजार समिती कायद्याचे संशोधन झाले पाहिजे असे राज्याच्या कृषी मंत्र्यांना शरद पवार यांनी पाठविलेले पत्रच भारतीय जनता पक्षाचे नेते ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी राज्यसभेत वाचून दाखविले. आपल्याच विधानावरून मागे हटण्याची सवय आता बदलली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी शरद पवार यांना दिला.Jyotirraditya Shinde read out Sharad Pawar’s letter in Rajya Sabha and gave advice


प्रतिनिधी

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात खासगी क्षेत्राची भागिदारी गरजेची असून यासाठी बाजार समिती कायद्याचे संशोधन झाले पाहिजे असे राज्याच्या कृषी मंत्र्यांना शरद पवार यांनी पाठविलेले पत्रच भारतीय जनता पक्षाचे नेते ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी राज्यसभेत वाचून दाखविले.

आपल्याच विधानावरून मागे हटण्याची सवय आता बदलली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी शरद पवार यांना दिला.संसदेत सध्या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा गाजत आहे. भाजपा खासदार ज्योतिर्रादित्य शिंदे यांनीही शेतकरी आंदोलनावर शरद पवार यांच्यावर टीका केलीय. राज्यसभा खासदार ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन करत असताना, शेतकरी आंदोलनावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना लक्ष्य केले आहे.

शरद पवार हे देशाचे कृषीमंत्री होते, तेव्हा 2010-2011 मध्ये त्यांनी देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. यात कृषी क्षेत्रात खासगी क्षेत्राची भागिदारी गरजेची असून यासाठी बाजार समिती कायद्याचे संशोधन झाले पाहिजे असे म्हटले होते.

शिंदेंनी पवारांच्या त्या पत्राची आठवण करुन देत, ते पत्रच राज्यसभेत वाचून दाखवले. काँग्रेसने 2019 च्या जाहीरनाम्यात केलेल्या उल्लेखाचा, आश्वासनाचा पाढाही ज्योतिरादित्य शिंदे यांनी वाचून दाखवला.

 

सन 2010 मध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना शरद पवार यांनी पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी एपीएमसी कायद्याचा उल्लेख केला होता. पण आता ते आपल्याच विधानावरून मागे हटत आहेत. ही सवय आता बदलली पाहिजे.

देशासोबत असा खेळ कुठपर्यंत चालणार? तुम्ही जर तुमच्या निर्णयावर ठाम राहिले तर तुमचा आणखी सन्मान वाढेल, असा टोलाही ज्योतिरादित्य शिंदेंनी पवारांना लगावला. दरम्यान, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ज्योतिर्रादित्य शिंदेंच्या भाषणाचे कौतुक करताना, त्यांना चिमटा घेतला.

शिंदे हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा आमची चांगली बाजू मांडत होते. तशीच बाजू आज त्यांनी भाजपची मांडली. वाह महाराज, आमचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे, असे सिंह म्हणाले.

Jyotirraditya Shinde read out Sharad Pawar’s letter in Rajya Sabha and gave advice

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*