#JusticeForRinkuSharma मॉब लिंचिंग झालेल्या रिंकू शर्माच्या न्यायासाठी हिंदू जनमानसात संतप्त आक्रोश


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रामभक्त रिंकू शर्माला न्याय मिळवून देण्यासाठी #JusticeForRinkuSharma या हॅशटॅगला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत असून हिंदू जनमानसात संतप्त आक्रोश व्यक्त होतो आहे.  #JusticeForRinkuSharma, librals keeps mum yet

ज्या रिंकूने तीनच वर्षांपूर्वी महमंद इस्लामच्या पत्नीला रक्तदान केले होते, त्याला इस्लामनेच मारावे, याबद्दल प्रचंड संतापाची भावना सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहे. रिंकू राम मंदिर निधी समर्पण कार्यक्रमात सहभागी होता. हेच त्याच्याविरोधातील चौघांच्या रागाचे कारण असल्याचे रिंकूच्या परिवाराचे म्हणणे आहे.सोशल मीडियावर या प्रकरणी प्रचंड संताप व्यक्त होत असून मराठी माध्यमांनी मात्र, हे संपूर्ण प्रकरणच नजरेआड केलेले दिसते आहे. एकाही मराठी वेबपोर्टलवर या बातमीची पुरेशी दखल घेण्यात आलेली नाही. त्याचबरोबर डावे, लिबरल, आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी देखील रिंकू शर्माच्या हत्येवरून गप्प आहेत. भारत हम शर्मिंदा है म्हणणारे आपापल्या बिळात लपून बसले आहेत.

रिंकू शर्मासाठी त्यांच्या बिळातून एकाही मेणबत्तीचा प्रकाश बाहेर आलेला दिसला नाही, अशी टीका सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

त्याचबरोबर मुस्लिम समाजाला भारतात असुरक्षित वाटते म्हणून आक्रोश करणारे हमीद अन्सारी, नसरुद्दीन शहा, अमिर खान, स्वरा भास्कर आदी सेलिब्रिटींच्या ट्विटर हँडलवरचा टिवटिवाट ऐकू येईनासा झाला आहे.

#JusticeForRinkuSharma, librals keeps mum yet

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी