कर्जबुडव्या नीरव मोदीच्या बचावासाठी उतरले होते जस्टिस काटजू, यूकेच्या कोर्टाने विश्वासार्हतेवर प्रश्न करून फटकारले

Justice Katju defends debt-ridden Nirav Modi, UK court slams On his credibility

लंडनस्थित वेस्टमिन्स्टर कोर्टाने कर्जबुडव्या नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारची विनंती मान्य केली आहे. कोर्टाने म्हटले आहे की, त्याच्याविरुद्धचे पुरावे त्याला आरोपित करून भारतात प्रत्यार्पणाच्या आदेशासाठी पुरेसे आहेत. नीरव मोदीने आपल्या बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु अखेर त्याचा पराभव झाला. एवढेच नव्हे, तर आपल्या बाजूने जबाब नोंदवण्यासाठी त्याने माजी सरन्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनाही हजर केले होते, परंतु कोर्टापुढे त्यांची मात्रा चालली नाही. Justice Katju defends debt-ridden Nirav Modi, UK court slams On his credibility


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लंडनस्थित वेस्टमिन्स्टर कोर्टाने कर्जबुडव्या नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारची विनंती मान्य केली आहे. कोर्टाने म्हटले आहे की, त्याच्याविरुद्धचे पुरावे त्याला आरोपित करून भारतात प्रत्यार्पणाच्या आदेशासाठी पुरेसे आहेत. नीरव मोदीने आपल्या बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु अखेर त्याचा पराभव झाला. एवढेच नव्हे, तर आपल्या बाजूने जबाब नोंदवण्यासाठी त्याने माजी सरन्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनाही हजर केले होते, परंतु कोर्टापुढे त्यांची मात्रा चालली नाही.

काटजू यांच्या साक्षीवर प्रश्नचिन्ह

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, गुरुवारी नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाचे आदेश देताना वेस्टमिन्स्टर कोर्टात जिल्हा न्यायाधीश सॅम गोझी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांची साक्ष विश्वासार्ह नाही. काटजू त्यांच्या वैयक्तिक अजेंड्यासाठी आणि प्रमुख टीकाकार म्हणूनच ओळखले जातात. फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात योग्य न्याय मिळणार नाही, असे सांगून काटजू हे नीरव मोदीचा बचाव करण्यासाठी गतवर्षी वेस्टमिन्स्टर कोर्टात हजर झाले होते.

वृत्तानुसार, न्यायाधीश सॅम गोझी म्हणाले, ‘न्यायमूर्ती काटजू यांच्या तज्ज्ञ मतावर आम्ही बोलत आहोत. 2011 मध्ये निवृत्त होईपर्यंत सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश असूनही त्यांनी दिलेले पुरावे आम्हाला कमी विश्वासार्ह वाटले. त्यांनी कोर्टात दिलेले पुरावे त्यांच्या वरिष्ठ न्यायिक सहकाऱ्यांवर नाराजी दाखवणारेच भासले. यात ते एक टीकाकार आणि आपला वैयक्तिक अजेंड्यावर आधारित दिसून आले.काय म्हणाले होते काटजू?

आपल्या साक्षीदरम्यान काटजू यांनी कोर्टाला सांगितले होते की, भारताची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब आहे, यासाठी नीरव मोदी यांना बळीचा बकरा बनविण्यात आले आहे. भारतात आर्थिक संकट ओढवल्याबद्दल दोषी ठरविण्यात त्यांना आले आहे. ते म्हणाले होते की, भारतीय सर्वोच्च न्यायालय भारत सरकारच्या अधीन झाले आहे. मात्र, याबाबत अद्याप काटजू यांच्या बाजूने कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

भारत सरकारवर शंका घेण्याचे कारण नाही

न्यायाधीश म्हणाले की, फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या बाजूने जसा दावा करण्यात येतोय, तसा कोणताही विपरीत राजकीय प्रभाव आढळलेला नाही. या प्रकरणात जनतेचे आणि माध्यमांचे मोठे हित लक्षात घेता, भारत सरकारच्या हेतूंवर शंका घेण्याचे कोणतेही कारण आहे, असेही न्यायाधीशांनी नमूद केले. न्यायाधीशांनी निकालामध्ये लिहिले की, “मी भारत आणि या देशातील मजबूत संबंधांचीही नोंद केली आहे. भारत सरकारने राजनैतिक आश्वासनांचे उल्लंघन केल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नसल्याचेही न्यायाधीशांनी यावेळी नमूद केले.

Justice Katju defends debt-ridden Nirav Modi, UK court slams On his credibility

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी