हा सगळा प्रकार अतिशय घाणेरडा आणि किळसवाणा.. अनिल देशमुखांच्या चौकशीस ज्युलिओ रिबेरे यांचा नकार! शरद पवारांना दिला घरचा आहेर..

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या अधिकाºयाने करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, सगळा सावळा गोंधळ चालू आहे. त्यामुळे या चौकशी आयोगात येण्यास नकार देत रिबेरो यांनी शरद पवार यांना घरचा आहेर दिला आहे. Julio Ribere’s refusal to appear in the commission for Anil Deshmukh’s inquiry, said its murky situation


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या अधिकाºयाने करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, सगळा सावळा गोंधळ चालू आहे. त्यामुळे या चौकशी आयोगात येण्यास नकार देत रिबेरो यांनी शरद पवार यांना घरचा आहेर दिला आहे.

ज्युलिओ रिबेरो यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना बॅड कॉप म्हणजे वाईट पोलीस अधिकारी असे म्हणून त्यांच्यावर आरोप केले होते. याचा फायदा घेत परमबीरसिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी रिबेरो यांच्याकडेच देण्याची गुगली पवारांनी टाकली होती. मात्र, रिबेरो यांनी ही विनंती फेटाळून लावली आहे.एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना रिबेरो म्हणाले, मला चौकशी आयोगासाठी विचारणा झाली तरी मी नकार देईल. मी ९२ वर्षांचा आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या चौकशी करण्याची क्षमता माझ्यामध्ये राहिली नाही. समजा माझी क्षमता असतील तरी मी नकारच दिला असता. याचे कारण म्हणजे या सगळ्या प्रकरणात सावळा गोंधळ सुरू आहे. माझ्यासारख्या माणसाने यामध्ये पडणे योग्य होणार नाही.

विद्यमान गृहमंत्र्यांच्य विरोधातील आरोपांच्या चौकशीचे नेतृत्व मी का करावे असा सवाल करून रिबेरो म्हणाले, शरद पवार यांनी स्वत:च या प्रकरणाची चौकशी करायला हवी. कारण ते पक्षाचे प्रमुख आहे. त्यांना सगळं काही माहित आहे. याविरोधात काही कारवाई करायची असेल तर तेच निर्णय घेऊ शकतात. त्यांनी हे करायलाच हवे. कारण लोक या सगळ्या प्रकरणामुळे संतप्त आहेत.

आपण या चौकशीसाठी कोणाचे नाव सुचविणार का? या प्रश्नावर रिबेरो म्हणाले, मी कोणाचेही नाव सुचविणार नाही. चांगल्या लोकांना या प्रकरणात गुंतविण्याची माझी तयारी नाही. याचे कारण म्हणजे या प्रकरणात एका खुनाचे धागेदोरे आहेत. मुंबई पोलीसांवरहे आरोप आहे. पोलीस अधिकाºयांच्यातील आपसातील स्पर्धा आणि विधीनिषेधशून्य राजकारणी यांच्यातील संबंधांमुळेच हे प्रकरण घडले आहे.

दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले होते, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत, असं म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी ज्युलिओ रिबेरो सारख्या एखाद्या उत्तम अधिकाऱ्या मार्फत चौकशी करावी.

Julio Ribere’s refusal to appear in the commission for Anil Deshmukh’s inquiry, said its murky situation

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*