हौसलों की उडाण …..जोया अग्रवाल आणि टिमची रेकॉर्ड तोड कामगिरी


  • भारताच्या मुलींचे अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली ते भारताच्या सिलिकॉन व्हॅलीपर्यंत ऐतिहासिक उड्डाण

विमानातील सर्व प्रवाशांना विनंती आहे की कृपया आपल्या खिडकीच्या काचेतून बाहेर बघा ….आपण उत्तर धुर्वावर आहोत…आणि हिवाळा असल्याने सहा महिन्यांची रात्र येथे सुरू आहे…नेत्रदीपक असे नाॅरदर्न लाईट्स सर्वत्र दिसत आहेत…..या सर्व सुचना प्रथमच एका महिला पायलट जोयाने आपल्या सह प्रवाशांना दिल्या…….म्हणतात ना , अगर किसी चिज को पुरी सिद्दत से चाहो तो पुरी कायनात तुम्हे ऊससे मिलानेमे जुड जाती है!….. Joya Agarwal and Teams record-breaking performance

मी कधी ते उंच उडणारे विमान उडवू शकेल ? आठ वर्षांची जोया आकाशाकडे एकटक बघत नेहमी हाच विचार करत असे..मात्र तिच्या आजुबाजुला असणारं वातावरण पाहता ती असं काही करणे शक्य नव्हते. पण तीचा स्वभाव तीला प्रेरणा देत असे जर मी स्वप्न पाहू शकते तर मी ते नक्कीच करू शकते .जेंव्हा जोयाने आपले स्वप्न आईला सांगितले तेंव्हा आईच्या डोळ्यात पाणी होतं कारण जोया आपल्या आई वडिलांची ती एकुलती एक मुलगी .ते तीला फुलांप्रमाणे जपत होते…आणि आमचं एकुलतं एक लेकरू पायलट होणार आणि उंच आकाशात उडणार हे त्यांच्या कल्पनेच्या पलिकडचं होतं.खूप सारे प्रश्न होते त्यांच्या नजरेत …बाबांना वाटले कदाचित जोया आपलं स्वप्न सोडून देईल ….मात्र जोया तीच्या निर्णयावर ठाम होती .

तीने पदवीच्या अभ्यासा सोबत एव्हिएशन वैमानीक बणन्याचा अभ्यासही सुरू ठेवला . तीची जिद्द आणि चिकाटी बघून आई वडिलांनी तीला साथ देण्याचे ठरवले…त्यांचा पाठिंबा आणि जोयाची मेहनत यामुळे खुपच कमी वयात जोयाने एअर इंडिया जाॅईन केले आणि 2013 मध्ये सर्वांत लहान वयात सर्वांत मोठे विमान उठवण्याचा विक्रम प्रस्थापित केला .जोया सांगते जेंव्हा ती महिला पायलट म्हणून रूजू झाली तेंव्हा अगदी बोटावर मोजण्याइतक्या महिला या क्षेत्रात होत्या. आज त्या 12% आहेत आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे संपूर्ण जगात भारतात सर्वात जास्त महिला पायलट आहेत. मला गर्व आहे की आम्ही भारतीय महिला आमच्या भारताचे नाव जगाच्या नकाशावर खूप उंच नेत आहोत अगदी आकाशात उडणार्या विमानासारखं…..असे आज जोया अभिमानाने सांगत आहे.

आणि आज जोया च्या विमानाने नवा ईतिहास रचला जगभरात भारताचा डंका वाजला एका वर्षात जिथे फक्त एकदाच सुर्य उगवतो आणि एकदाच मावळतो म्हणजे सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असणार्या ठिकाणी जोयाने उड्डाण केले .जगातील सर्वात लांब हवाई मार्गाच्या उत्तर ध्रुव वर उड्डाण करण्याचा विक्रम तीने अन् तीच्या टिमने केला आहे.
कोण म्हणतो की आजही महिलांना कोणतेही काम करण्यासाठी पुरुषांच्या सहकार्याची आवश्यकता आहे? जर आपल्या देशातील महिला जगातील सर्वात लांब हवाई मार्गाच्या उत्तर ध्रुवावर उड्डाण करू शकतात तर आज महिला काहीही करू शकतात. …

एअर इंडियाच्या 4 महिला वैमानिकांनी जगातील सर्वात लांब हवाई मार्गावरील उत्तर ध्रुवावर उड्डाण करून एक नवा इतिहास रचला आहे. रविवारी अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथून उड्डाण घेतल्यानंतर, महिला पायलटांची ही टीम उत्तर ध्रुवमार्गे बेंगळुरूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. या प्रवासादरम्यान त्यांनी सुमारे 16,000 किमी अंतर पार केले. ही माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली असून आपला व्हिडिओही शेअर केला आहे.

यापूर्वी एअर इंडियाच्या वैमानिकांनीही ध्रुवीय मार्गावर उड्डाण केले होते पण महिला पायलट टीमसह उत्तर ध्रुवाकडे उड्डाण करणारे हे प्रथमच विमान आहे. एअर इंडियाच्या एका अधिकार्याने सांगितले की उत्तर ध्रुवावर उड्डाण करणे अत्यंत आव्हानात्मक आहे आणि विमान कंपन्या या मार्गावर आपले उत्तम आणि अनुभवी पायलटच पाठवतात .

Joya Agarwal and Teams record-breaking performance

भारतात येताच एअर इंडियाने आपल्या ट्विटर हँडलवरून या महिला वैमानिकांचे स्वागत केले. एअर इंडियाने ट्विट करुन लिहिले आहे की, ‘वेलकम होम, आम्हाला तुमच्या सर्वांचा अभिमान आहे (महिला वैमानिक). आम्ही एआय 176 च्या प्रवाशांचे अभिनंदन करतो, जे या ऐतिहासिक प्रवासाचा एक भाग बनले आहेत. कॅप्टन झोया अग्रवाल, कॅप्टन पापागरी तन्मई, कॅप्टन शिवानी आणि कॅप्टन आकांक्षा सोनवरे यांच्यासह हे विमान पूर्णपणे महिला वैमानिकांकडून चालविण्यात आले होते आणि विमानाचे नेतृत्व कॅप्टन झोया अग्रवाल ह्या करीत होत्या.

एआय-176 शनिवारी सॅन फ्रान्सिस्कोहून रात्री 8.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) रवाना झाले आणि भारतीय प्रमाणवेळेनुसार हे विमान सोमवारी पहाटे ३.४५ वाजता बेंगळुरूला पोहोचले. सॅन फ्रान्सिस्कोहून बेंगळुरूला निघालेले हे नॉन-स्टॉप विमान सुमारे 17 तास प्रवास करून आले आहे.

भारत की बेटियां

झोया म्हणते ‘डॉटर्स ऑफ इंडिया’ असण्याचा आम्हाला सार्थ अभिमान या पूर्वीही उत्तर ध्रुवावरून उड्डाण करण्यात आलेलं आहे. पण संपूर्ण महिला टीमने केलेली ही पहिलीच कामगिरी आहे. भारताच्या मुलींनी अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीपासून ते भारताच्या सिलिकॉन व्हॅलीपर्यंतची ऐतिहासिक उड्डाण घेतील, .या मार्गाने सुमारे 10 टन इंधन वाचवले जाणार आहे. भारताचे पंतप्रधान मोदींनी आम्हा महिलांना प्रेरणा दिली आहे.

भारत की बेटियां

पायलट शिवानी मनहास म्हणाली ‘हा एक रोमांचक अनुभव होता कारण यापूर्वी कधीही असे झाले नव्हते येथे पोहोचण्यास सुमारे 17 तास लागले. ‘
उत्तर ध्रुवावरुन उड्डाणानंतर कॅप्टन झोया अग्रवालच्या विक्रमी यादीमध्ये आणखी एक मैलाचा दगड सामील होईल. यापूर्वी 2013 मध्ये कॅप्टन झोयाने बोईंग -777 विमान उड्डाण केले होते. त्यानंतर बोईंग -777 विमान उडविणारी ती सर्वात तरुण महिला पायलट ठरली होती .

वंदे भारत मिशनला महत्त्व

सॅन फ्रान्सिस्कोवरून बंगळुरूपर्यंत महिला वैमानिकांनी ऐतिहासिक उड्डाण घेतलं आहे. त्यामुळे वंदे भारत मिशनला आणखी महत्त्व आलं आहे. या मिशनद्वारे आतापर्यंत 46.5 लाखाहून अधिक लोकांना आंतरराष्ट्रीय सुविधा देण्यात आली आहे, असं नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी म्हटलं आहे. (In a first, all-women Air India crew fly from San Francisco to Bengaluru)

आजही जोयाच्या आईच्या डोळ्यात पाणी होतं मात्र आनंदाच आणि अभिमानचं..स्वप्न बघा आणि त्यावर ठाम रहा …..अशक्य काहीच नाही…Impossible itself says I m possible ….स्वप्न थांबले की आयुष्य थांबते ….हा संदेश जोयाने सर्व महिलांना दिला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती