आयजी जीवावर बायजी उदार, बायडेनच्या विजयावर पवार “सुभेदार”


विशेष प्रतिनिधी

मुंबई : तिकडे अमेरिकेत ज्यो बायडेन काय जिंकलेत… इकडे राष्ट्रवादीवाले स्वतःच्या पंखातले ५४ जागांचे लिमिटेड बळ विसरून नको एवढे उंच उडायला लागतेत… ते आयजीच्या जीवावर बायजी उदार या मराठी म्हणीच्या धर्तीवर “बायडेनच्या विजयावर पवार “सुभेदार” झाल्याच्या मोठमोठ्या वल्गना करायला लागलेत. jitendra awhad news

 

आधी खासदार सुप्रिया सुळेंनी बायडेन आणि शरद पवार यांच्या पावसातल्या भिजण्याची अस्थानी तुलना करणारा फोटो शेअर केला आणि आता तोच फोटो शेअर करून पवार इफ्केट अमेरिकेत दिसल्याचे ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलेय.jitendra awhad news

 

बायडेन यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भाष्य केलेय. निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर आव्हाडांनी यांनी शरद पवार यांचा साताऱ्यातील पावसातील सभेचा फोटो आणि बायडेन यांचा फ्लोरिडातील फोटो ट्विट केला आहे.

 

त्याचबरोबर या फोटोवर आव्हाड यांनी भाष्यही केले आहे. “पवार साहेब फॅक्टर अमेरिकेत सुद्धा यशस्वी ठरला आहे. अखंडपणे केलेले कठीण परिश्रम व वचनबद्धताच विजयी ठरते. आशा जिवंत आहेत,” असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

jitendra awhad news

खासदार सुप्रिया सुळे आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरून बायडेन यांच्या विजयापेक्षा शरद पवारांचा राजकीय साईज त्यांच्या मूळ साईजपेक्षा मोठा दाखविण्याची हौस मात्र भागवून घेतल्याचे स्पष्ट दिसतेय. पण त्यामुळे “आयजीच्या जीवावर बायजी उदार” ही मराठी म्हण राष्ट्रवादीने आता “बायडेनच्या विजयावर पवार सुभेदार” अशी बदलून घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती