बायडेन मोदींना पाहून म्हणाले, तुम्हाला पाहून खूप छान वाटले…

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनच्या विरोधातील आघाडी म्हणून पाहिले जात असलेल्या क्वाड देशांची व्हर्च्युल बैठक शुक्रवारी झाली. यावेळी निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी समोरासमोर आले. यावेळी बायडेन मोदींना पाहून म्हणाले, तुम्हाला पाहून खूप छान वाटत आहे. यावेळी मोदींनी हसून त्यांना प्रतिसाद दिला. Joe Biden At Quad Meet Says, PM Modi, Great To See You

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बाययडेन, आॅस्ट्रेलिया पंतप्रधान स्कॉय मॉरिसन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिखर परिषद शुक्रवारी सुरू झाली.

यावेळी बोलताना बायडेन म्हणाले, परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी क्वाड एक नवीन तंत्र बनले आहे. आपल्या कर्तव्याचा विसर पडू देता कामा नये. आंतरराष्टÑीय कायद्यांचा मान राखून सावैभौमिक मूल्यांची जपणूक करणे हे आमचे कर्तव्य आहे. आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे काम केले तर हे नक्कीच घडू शकेल, अशी मला आशा आहे.यावेळी बोलताना मोदी म्हणाले, हवामन बदल, वाढते औद्योगिकीकण यासारख्या क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे काम करण्यासाठी क्वाड देशांची आघाडी बनली आहे.जागतिक पातळीवर चांगले घडविण्यासाठी या ताकदीचा उपयोग होणार आहे. आपल्या लोकशाही मुल्यांचे रक्षण आणि मुक्त आणि सर्वसमावेशक हिंदी- पॅसिफिक महासागर यांच्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. भारताच्या वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेचेच हे विस्तारित रुप आहे. भारत संपूर्ण विश्वाला एक परिवार मानते.

Joe Biden At Quad Meet Says, PM Modi, Great To See You

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*