वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : शेतकरी आंदोनलनावरून ग्लोबल सेलिब्रिटी ट्विटर थयथयाट करीत असताना अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाने भारतातील कृषी सुधारणा कायद्यांचे स्वागत केले आहे.joe biden administration supports farm laws in india
नव्या कृषी सुधारणा कायद्यामुळे जगातील बाजारावर भारताचा प्रभाव वाढेल. अशा प्रकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, कृषी कायद्यांन शांततापूर्ण विरोध हा भरभराट होणाऱ्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या कायद्याबद्दल मतभेद असतील तर ते चर्चेतून दूर करता येऊ शकतात, अशी प्रतिक्रिया बायडेन प्रशासनाने व्यक्त केली आहे.
भारताच्या बाजाराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आकर्षित करणाऱ्यांचे स्वागत आहे. परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, बायडेन सरकार कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या निर्णयाचे समर्थन करते. नवीन कृषी कायदे खासगी गुंतवणुकीस आकर्षित करतात आणि शेतकर्यांसाठी अधिकाधिक बाजारपेठांना आकर्षित करू शकतात.
भारतातील शेतकर्यांच्या आंदोलनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, अमेरिका भारतातील पक्षांतर्गत मतभेदांचे निराकरण करण्याच्या बाजूने आहे. शांततेत निषेध करणे ही कोणत्याही लोकाशाहीच्या भरभराटीची वैशिष्ट्य आहे आणि भारतीय सर्वोच्च न्यायालयानेही असेच म्हटले आहे.
एकीकडे अमेरिकेतील बायडेन सरकार भारत सरकारला पाठिंबा देताना दिसत आहे तर अनेक अमेरिकन भारतातील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. अमेरिकन कॉंग्रेसचे हेली स्टीव्हन्स म्हणाल्या की, नवीन कृषी कायद्यांविरोधात शांततापूर्ण आंदोलन करणार्यांविरूद्ध कारवाई केल्याबद्दल मला काळजी वाटते.