Jobs : रिझर्व्ह बँकेत 241 जागांवर भरती, 10वी पासही करू शकतात अर्ज, असे आहेत पात्रतेचे निकष..

Jobs: Recruitment for 241 posts in RBI, can also apply for 10th pass, here are the terms and conditions

भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या विविध कार्यालयांमध्ये सुरक्षारक्षक पदांवर भरतीसाठी अधिकृत संकेतस्थळावर एक सूचना प्रकाशित केली आहे. रिझर्व्ह बँकेची rbi.org.in ही अधिकृत वेबसाइट आहे. या सूचनेनुसार इच्छुक आणि योग्य माजी सैनिक रिझर्व्ह बँकेच्या सुरक्षा रक्षक भरतीसाठी 22 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या विविध कार्यालयांमध्ये सुरक्षारक्षक पदांवर भरतीसाठी अधिकृत संकेतस्थळावर एक सूचना प्रकाशित केली आहे. रिझर्व्ह बँकेची rbi.org.in ही अधिकृत वेबसाइट आहे.  या सूचनेनुसार इच्छुक आणि योग्य माजी सैनिक रिझर्व्ह बँकेच्या सुरक्षा रक्षक भरतीसाठी 22 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्जांची निवड आणि भरतीसंबंधी सर्व माहिती या सूचनेत सविस्तरपणे देण्यात आली आहे. एकूण 241 जागांवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. Jobs: Recruitment for 241 posts in RBI, can also apply for 10th pass, here are the terms and conditionsआरबीआयच्या या जागा राज्यनिहाय वेगवेगळ्या आहेत. अर्ज केल्यानंतर उमेदवारांना ऑल इंडिया ऑनलाइन टेस्ट द्यावी लागेल. उत्तीर्ण होणाऱ्यांना एका शारीरिक चाचणीलाही सामोरे जावे लागेल. निवड झालेल्या उमेदवारांना 10,940/- रुपयांचा मूळ वेतनावर नोकरीवर रुजू केले जाईल. यासोबतच नियमानुसार इतरही भत्ते दिले जातील. माजी सैनिक या पदांवर भरतीसाठी पात्र आहेत. याशिवाय उमेदवारांचे 10वी पास असणेही गरजेचे आहे.


Jobs : महाराष्ट्र मेट्रोमध्ये 10वी पास ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज, आज अखेरची तारीख


अर्ज करणाऱ्यांचे कमाल वय 25 वर्षे ठरवण्यात आले आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतून सूट देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना 50 रुपये अर्ज शुल्क द्यावे लागतील. ऑनलाइन अर्ज 22 जानेवारीपासून सुरू झाले आहेत. अर्जांची अंतिम मुदत 12 फेब्रुवारी 2021 पर्यंत आहे.

आरबीआयची सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Jobs: Recruitment for 241 posts in RBI, can also apply for 10th pass, here are the terms and conditions

Jobs: Recruitment for 241 posts in RBI, can also apply for 10th pass, here are the terms and conditions

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती