वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनातील हिंसाचार घडविणाऱ्या फरार पंजाबी अभिनेता दीप सिंधूसह चौघांच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.Jan 26 violence: Delhi Police announce Rs 1L reward for information on Deep Sidhu, flag-hoister Jugraj Singh
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवणारा आणि प्रक्षोभक चिथावणीखोर भाषण करणारा दीप सिंधू याच्यासह इतर सहा जण अद्याप फरार आहेत. या सर्वांच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी लाखो रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहेत. यात दीप सिंधूसह चौघांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाखाचे रोख बक्षीस तर उर्वरित तीन जणांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी ५०,००० रुपयांचे बक्षीस दिल्ली पोलिस देणार आहेत.
दीप सिंधूसह जुगराज सिंग, गुरजोत सिंग आणि गुरजंत सिंग यांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येईल, तर हिंसाचाराला जबाबदार असलेल्या जाजबीर सिंग, बूटा सिंग, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंग यांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी ५०,००० रुपये रोख रक्कम देण्यात येईल.
Delhi Police announce cash reward of Rs 1 lakh each for information leading to arrest of Deep Sidhu, Jugraj Singh, Gurjot Singh & Gurjant Singh, & Rs 50,000 each for arrest of Jajbir Singh, Buta Singh, Sukhdev Singh & Iqbal Singh for their alleged involvement in Jan 26 violence.
— ANI (@ANI) February 3, 2021
लाल किल्ल्यावरील गोंधळाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
शेतकरी आंदोलनात प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी दाखल जनहित याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चात आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढून धार्मिक झेंडा फडकावला होता. यावरून सुप्रीम कोर्टात २७ जानेवारी दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणांवर आज सुनावणी होत आहे.