लेहमधील भाग जम्मू -काश्मीरमध्ये दाखविल्याप्रकरणी केंद्राची ट्विटरला नोटीस


ट्विटर या सोशल नेटवर्कींग साईटने नकाशात लेहमधील भाग जम्मू काश्मीरमध्ये दाखवला होता. याप्रकरणी केंद्राकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. हा भाग केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये का दाखवण्यात आला नाही अशी विचारणा केली आहे. केंद्र सरकारने ट्विटरला नोटीस पाठवली असून पाच दिवसांत स्पष्टीकरण मागितलं आहे. jammu kashmir news


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ट्विटर या सोशल नेटवर्कींग साईटने नकाशात लेहमधील भाग जम्मू काश्मीरमध्ये दाखवला होता. याप्रकरणी केंद्राकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. हा भाग केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये का दाखवण्यात आला नाही अशी विचारणा केली आहे. केंद्र सरकारने ट्विटरला नोटीस पाठवली असून पाच दिवसांत स्पष्टीकरण मागितलं आहे. jammu kashmir news

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. चुकीचा नकाशा दाखवून भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा अनादर केल्याबद्दल कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये? अशी विचारणा मंत्रालयाकडून करण्यात आली असून उत्तर देण्यासाठी पाच दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. jammu kashmir news

९ नोव्हेंबरला ही नोटीस पाठवण्यात आली. पूर्वीचे जम्मू-काश्मीर राज्य जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजित करण्यात आलं आहे. लेह हा लडाखचा भाग आहे. ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार 31 ऑक्टोबरपासून जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले आहे.

jammu kashmir news

लेह हा लडाखचा भाग असून ट्विटरने नकाशात जम्मू काश्मीरचा भाग दाखवला आहे. लेह लडाखमध्ये का दाखवण्यात आला नाही अशी विचारणा देखील केंद्र सरकारने केली आहे. लडाख हा चीनचा भाग आहे असे काही दिवसांपूर्वी ट्विटरने त्यांच्या नकाशात दाखवले होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती