जम्मू-काश्मीरला रेल्वेची मोठी भेट, आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल बनतोय


जम्मू-काश्मीरला भारतीय रेल्वे या वर्षी सर्वात मोठी भेट देत आहे. येथील चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच पूल बांधला जात असून लवकरच त्याचे काम पूर्ण होणार आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला भारतीय रेल्वे या वर्षी सर्वात मोठी भेट देत आहे. येथील चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच पूल बांधला जात असून लवकरच त्याचे काम पूर्ण होणार आहे.

अत्यंत दुर्गम क्षेत्रामध्ये तब्बल ११०० कोटी रुपयांचा निधी यासाठी खर्च केला जाणार आहे. अर्धचंद्र आकारातील या पुलासाठी २४ हजार टन पोलाद वापरले जाणार आहे. या पुलाची उंची नदीपासून ३५९ मीटर उंच आहे.

चीनमधील बेईपैन येथील शुईबाई नदीवरील २७५ मीटर उंचीचा सध्या जगातील सर्वाात उंच पूल मानला जातो.
चिनाब नदीवरील पुलाचे वैशिष्टय म्हणजे हा पूल प्रति तास २६० किलोमीटर वाहणारे वारेही सहन करू शकतो. अभियांत्रिकीतील एक आश्चर्य मानला जाणारा १.३१५ किलोमीटर लांबीचा हा पूल बक्कल (कटरा) आणि कौडी (श्रीनगर) यांना जोडतो. हा पूल आयफेल टॉवरपेक्षाही मोठा आहे. कारण आयफेल टॉवर ३२४ मीटर उंच आहे.

या पुलामुळे काश्मीरला येणार्या पर्यटकांचा वेळ वाचणार आहे. या पुलच्या जवळच एक रोप-वेही असणार आहे. त्यामुळे पर्यटकांना या पुलाचे विहंगम दर्शन घेणे शक्य होणार आहे.
काश्मीरला भारताशी जोडणार्या मार्गावरील या पुलाचे काम २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या मार्गावर पुलाबरोबरच अनेक बोगदेही आहेत. चेनानी-नाशरी या सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.

काश्मीरला भारताशी खर्या अर्थाने जोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना आखल्या आहेत. यापैकीच रेल्वे मार्गाचा विस्तार ही एक आहे. रेल्वे मार्गांचे जाळे तयार झाल्यावर काश्मीरमध्ये उद्योगधंदेही येतील. त्यामुळे लोकांना रोजगार मिळणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती