जैश उल् हिंद संघटनेने घेतली दिल्ली स्फोटाची जबाबदारी; इस्त्रायलची टीमही येणार मदतीला; इराणी कनेक्शनचाही शोध सुरू


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीत शुक्रवारी हायेस्ट सिक्युरिटी झोनमध्ये इस्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या तपासाची चक्र फिरली आणि आता या स्फोटमागचे एकएक धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागण्यास सुरुवात झाली आहे. Jaish Ul Hind Organisation takes responsibility for Delhi blast

दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल, क्राईम ब्रांच आणि एनआयए या तीन संरक्षण – तपास यंत्रणांकडून सदर प्रकरणाच्या मूळाशी पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. इस्त्रायलची टीम तपासकार्यात मदतीसाठी दिल्लीत दाखल होत आहे. या हल्ल्याची जबाबदारी आता एका जैश उल् हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेकडून घेण्यात आली आहे.दिल्ली हल्ल्याची जबाबदारी घेणारी ही संघटना आहे जैश उल हिंद. सध्याच्या घडीला या संघटनेकडून हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली असली तरीही ही नेमकी कोणत्या प्रकारची संघटना आहे, यामागे नेमका कोणाचा हात आहे आणि ही संघटना कोणाशी जोडली गेली आहे, ही कोणती स्लीपर सेल आहे का याबाबतची नेमकी माहिती मात्र अद्यापही समोर आलेली नाही.

अर्थात, तपास यंत्रणांना स्फोटाच्या जागेवर एक बंद एन्वलप आढळला होता. त्यात इस्त्रायली दूतावासातील अधिकाऱ्यांना उद्देश्यून मजकूर होता. इराणी जनरल आणि इराणी अणूशास्त्रज्ञाच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देश्याने हा स्फोट करण्यात आल्याचे त्या चिठ्ठीत लिहिलेले आढळले. ही प्राथमिक तपासातली माहिती आहे. तपासकाम अजून सुरू आहे. त्यात वेगवेगळी तथ्ये बाहेर येत आहेत.

Jaish Ul Hind Organisation takes responsibility for Delhi blast

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती