जय श्रीरामच्या घोषणांनी पश्‍चिम बंगाल विधानसभेचे सभागृह दणाणले, ममतांकडून मतदारांसाठी अनेक योजना जाहीर

विशेष प्रतनिधी

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून त्याचा प्रत्यय आता दर क्षणी येवू लागला आहे. विधानसभेत आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लेखानुदान मांडण्यावरूनही जोरदार पडसाद उमटले. Jai Shriram Announcement West Bengal Legislative Assembly

अर्थमंत्री अमित मित्रा यांची तब्येत ठिक नसल्याने ममता बॅनर्जी यांनी लेखानुदान मांडण्याची जबाबदारी घेतली. परंतु मित्रा यांनीच लेखानुदान मांडावे अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली. मात्र तरीही ममता बॅनर्जीच लेखानुदान मांडण्यास सभागृहात उभे राहिल्या. त्यावेळी भाजपच्या आमदारांनी जय श्रीरामाच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.

भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सभापतींनी तंबी देताच भाजपच्या आमदारांनी अखेर सभात्याग केला. भाजप सदस्यांच्या घोषणाबाजीवर ममता बॅनर्जी यांनी टीका केली.


दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी ३ हजार कोटींचे लेखानुदान मांडले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवत त्यांनी अनेक नवीन योजनांच्या घोषणा केल्या. प्रचंड संख्येने उड्डाणपूल, भरती, अर्धवेळ शिक्षकांची भरती, शाळेच्या संख्येत वाढ, चहा मळ्यात आणि शाळेत राजभांषी आणि अलिचिकी भाषा शिकवण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करणे आदींचा समावेश होता.

राज्यात ८६ हजार किलोमीटर मार्गाचे नवीन रस्ते, सिंचनासाठी १०० कोटींची तरतूद, मोफत रेशनधान्य वाटप, १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत रोड टॅक्स माफी, वर्धमान जिल्ह्यातील अंदल विमानतळाचा दीडशे कोटी खर्चून विकास करणे आदींचा समावेश आहे.

Jai Shriram Announcement West Bengal Legislative Assembly

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*