चिनी राष्ट्राध्यक्षांशी पंगा घेतलेले सर्वात श्रीमंत चिनी उद्योजक अलिबाबाचे संस्थापक जॅक मांचा ठावठिकाणा अजूनही नाही

अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि चीनमधील सर्वात श्रीमंत उद्योगपती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी पंगा घेतल्यापासूनच ते अजूनही गायब असल्याने घातपाताची भीती व्यक्त केली जात आहे. Jack Ma founder of Alibaba who has clashed with the Chinese president, is still missing


विशेष प्रतिनिधी

शांघाय : अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि चीनमधील सर्वात श्रीमंत उद्योगपती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी पंगा घेतल्यापासूनच ते अजूनही गायब झाल्याने घातपाताची भीती व्यक्त केली जात आहे.

जॅक मा यांनी ऑक्टोबर महिन्यात शांघायमध्ये एक भाषण केलं होतं. त्यांनी जागतिक बँकिंग नियमांना ज्येष्ठ नागरिकांचा क्लब म्हणत जोरदार टीका केली होती. तसेच चीनच्या व्याजखोर वित्तीय नियम आणि सरकारी बँकांच्या कार्यप्रणालीवर सडकून टीका केली होती. चिनी कम्युनिस्ट सरकारवरही त्यांनी कठोर शब्दात टीका केली होती. त्यामुळे जिनपिंग सरकारविरोधात चिनी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने जिनपिंग सरकार भडकले होते. या टीकेनंतर जॅक मा पुन्हा दिसलेच नाहीत. त्यामुळे जॅक मा गेले कुठे? असा सवाल केला जात आहे.उद्योग क्षेत्रात होणाऱ्या बदलांना बळ देण्यासाठी सरकारी सिस्टिममध्ये बदल घडवून आणण्याचे आवाहन जॅक मा यांनी केलं होतं. वैश्विक बँकिंग नियमांवरही टीका केली होती. त्यांच्या या भाषणाने सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष नाराज झाला होता. कम्युनिस्ट सरकारने चौकशीचा ससेमिरा लावला. त्यांच्या अँट ग्रुपचा 37 अब्ज डॉलरचा आयपीओही रद्द करण्यात आला होता.

चिनी सरकारने नाताळच्या दिवशी जॅक मा यांना पुढील आदेश येईपर्यंत चीन सोडण्यास मज्जाव केला होता. अलिबाब समूहाची चौकशी सुरू असल्याने हा मज्जाव करण्यात आला होता. मात्र, त्या आधीपासूनच जॅक मा यांचा कुठेच ठावठिकाणा लागत नसल्याचे बोलले जात आहे. जॅक मा यांच्या या कंपनीच्या आयपीओला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. मात्र, शांघाय आणि हाँगकाँगच्या मार्केटमध्ये शेअर्सच्या यादीत केवळ 2 दिवस आधीच चीन सरकारने त्यावर बंदी घातली.

चौकशीच्या आदेशानंतर हाँगकाँग बाजारात अलीबाबाच्या शेअर्सची 6 टक्के पडझड झाली. अलीबाबा कंपनीकडून छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांशी इतर कुणाशीही व्यापार न करण्याचा करार केला जात असल्याचाही आरोप आहे. यामागे प्रतिस्पर्धी कंपन्यांचा माल विकला जाऊ नये अशी रणनीती होती. म्हणजेच जे व्यापारी अलीबाबासोबत व्यवसाय करत होते ते इतर कुणाशीही व्यवसाय करु शकत नाही. पीपल्स बँक ऑफ चायनाने 24 डिसेंबर 2020 रोजी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये आर्थिक नियंत्रण संस्था अलीबाबाच्या व्यवहारांची चौकशी करतील.

जॅक मा यांच्या बेपत्ता होण्यामुळे चीन सरकारविरोधी बोलणारे लोक बेपत्ता होण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. जॅक यांनी चीनच्या सत्ताधारी पक्षावर टीका केली होती. त्यानंतर नोव्हेंबरपासून त्यांना कुणीही पाहिलेले नाही. असं असलं तरी चीन सरकारवर टीका केल्यानंतर अशाप्रकारे अचानक बेपत्ता होणारे जॅक पहिले नाहीत. याआधी देखील सरकारविरोधी बोलल्यानंतर चीनमध्ये अनेक मोठमोठ्या व्यक्ती गायब झाल्या आहेत. त्यामुळे चीनमध्ये सरकारविरोधात बोलणारे लोक बेपत्ता होत असल्याचा गंभीर आरोप होत आहे.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी 2013 मध्ये सत्ता काबिज केल्यानंतर काही कायदे केले आहेत. यात राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर अनेक दमनकारी कायदे करण्यात आले. यामुळे चीन सरकारला निरंकुश अधिकार देण्यात आले आहेत. फॅन बिंगबिंग चीनमधील सर्वात कमाई करणारी अभिनेत्री आहे. तिने एक्स-मन आणि आयर्न मॅनसारख्या चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. मागील वर्षी जूनमध्ये फॅनवर कथित करचोरीचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आलं. मात्र, नंतर मोठा काळ फॅन बिंगबिंग बेपत्ता झाली. त्यामुळे चिनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म वीबोवर तिच्या 63 मिलियन (6 कोटी 30 लाख) चाहत्यांना चांगलाच झटका बसला. जवळपास 100 दिवसांपेक्षा अधिक दिवस बिंगबिंग बेपत्ता होती.

कॅनडाचे नागरिक असलेले आणि चिनी दूरसंचार कंपनी हुआवेईच्या मुख्य आर्थिक विभागाच्या अधिकारी मेंग वानझू यांना अटक करण्यात आली. त्यानंतर तात्काळ उद्योगपती मायकल स्पॉवर आणि माजी राजदूत मायकल कोवृग यांना डिसेंबरमध्ये ताब्यात घेण्यात आले होते.

Jack Ma founder of Alibaba who has clashed with the Chinese president, is still missing

चिनी वैज्ञानिक जियानकुई नोव्हेंबरमध्ये गायब झाले होते. आतापर्यंत त्यांना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पाहिलेलं नाही. द न्यूयॉर्क टाइम्सने डिसेंबरच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांचा एक फोटो प्रकाशित केला होता. यात त्यांनी जियानकुई सुरक्षित असून त्यांना नजरकैद केलं असल्याची माहिती दिली. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी 12 सुरक्षा कर्मचारी आहेत. इंटरपोलचे माजी अध्यक्ष मेंग होंगवेई फ्रांसमध्ये आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहत होते. सप्टेंबरमध्ये ते आपल्या देशात परतले. मेंग चीनमध्ये सार्वजनिक सुरक्षा विभागाचे उपमंत्री देखील राहिलेले आहेत. मात्र, ते 29 सप्टेंबरपासून बेपत्ता झाले होते. त्यांच्या पत्नीनेच ही माहिती दिली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*