दक्षिण विरुद्ध उत्तर भारत फूट पाडण्याचे राहुल गांधीचे हीन राजकारण, जे. पी. नड्डा यांचा हल्लाबोल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राहुल गांधी देशात जेथे जातात त्याच्या दुसऱ्या भागाबद्दल विष ओकतात, असे भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटले आहे. राहुल गांधी दक्षिण विरुद्ध उत्तर भारत अशी फूट पाडण्याचे हीन राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. J.P. Nadda lashesh on Rahul Gandhi

राहुल गांधी यांनी वायनाडचे खासदार म्हणून आलेला स्वानुभव सांगताना नवीन वादाला जन्म दिला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी, राहुल गांधी कृतघ्न असून ‘रिकाम्या भांड्याचा आवाज जास्त’ या धर्तीचे बोलत आहेत, असा आरोप केला.त्यांनी म्हटले, की सोनिया गांधी या उत्तर भारतातूनच लोकसभेवर प्रतिनिधित्व करतात हे राहुल गांधींना माहिती पाहिजे. गांधी घराण्याने विभाजनकारी राजकारणाशिवाय काही केले नाही व आता राहुल गांधी दक्षिण विरुद्ध उत्तर असा वाद पेटविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आता उत्तर भारताचाच अपमान केला आहे.

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, आम्ही साऱ्या भारतालाच माता मानतो,’ असा ऐकवून उत्तर दिले आहे. बिहार विधीमंडळात राहुल गांधी यांचा निषेध- निंदाव्यंजक ठराव आणण्याची तयारी भाजपने केली आहे.

J.P. Nadda lashesh on Rahul Gandhi

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी