कॉंग्रेसचे राजकारण हत्तीप्रमाणे, खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे – नड्डा यांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

गुवाहटी – कॉंग्रेसकडून केवळ विरोधासाठी विरोध असे राजकारण केले जात आहे आणि कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास आसामला ‘काले दिन’ येतील असा हल्लाबोल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केला. J.P. Nadda lashes on congress in Assam

दिब्रुगड जिल्ह्यातील तिंगखोंग येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना नड्डा म्हणाले, की कॉंग्रेसकडून नेहमीच संधीसाधूचे राजकारण केले जाते. कॉंग्रेसने केरळ येथे मुस्लिम लिगबरोबर आघाडी करुन माकपच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत.तर पश्चि म बंगाल आणि आसाममध्ये डाव्यांशी आघाडी केली आहे. कॉंग्रेसचे राजकारण हत्तीप्रमाणे आहे. खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे, असा कॉंग्रेसचा चेहरा आहे. कॉंग्रेस बोलते एक आणि करते दुसरेच.

ते म्हणाले, २००६ मध्ये माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी बदरुददीन कोण आहे, अशी विचारणा केली होती. आज त्याच बदरुद्दीनबरोबर कॉंग्रेसची आघाडी आहे. कॉंग्रेस सोयीने राजकारण करते. आता राहुल गांधी म्हणतात, बदरुद्दीन हा आसामचा चेहरा आहे. परंतु प्रत्यक्षात आसामची प्रतिमा गोपीनाथ बोरडोलोई, भूपेन हजारिका, शंकरदेव यांच्या नावाने ओळखली जाते.

J.P. Nadda lashes on congress in Assam

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*