ऐकावे ते नवलचं …23 वर्षानंतर पंखा चोरून नेल्याबद्दल शिक्षा, दंडासह एक वर्ष तुरूंगवास

1998 साली पंखा चोरण्याच्या गुन्ह्यात न्यायालयाने एका मध्यमवयीन व्यक्तीला दोषी ठरवले आहे आणि त्याला एक वर्षाची शिक्षा आणि दंड देखील ठोठावला आहे. हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पाच साक्षीदारांना न्यायालयात हजर करण्यात आले. 

विशेष प्रतिनिधी


इंदौर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये जिल्हा कोर्टाने मध्यमवयीन व्यक्तीला 23 वर्षांच्या जुन्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरवत शिक्षा ठोठावली. एका दुकानात घुसून आरोपींने दोन पंख्यांची चोरी केली होती. It’s strange to hear … After 23 years, for stealing a fan, punishment, one year imprisonment with fine


त्या मध्यमवयीन व्यक्तीवर गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला एक वर्षाच्या तुरूंगवास आणि एक हजार रुपये दंड देखील भरावा लागेल. 

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी भूपेंद्र आर्य यांनी 55 वर्षीय शंकर यांना मंगळवारी भारतीय दंड संहितेच्या कलम 457 आणि 380 अंतर्गत शिक्षा सुनावली. शंकरने 23 वर्षांपूर्वी दुकानातून पंखा चोरला होता. त्यावेळी आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले होते .या सुरु असलेल्या खटल्यात फिर्यादीने हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी न्यायालयात पाच साक्षीदार हजर केले. हा आरोप सिद्ध झाल्यास शंकर यांना एक वर्षाची शिक्षा आणि त्याबरोबरच एक हजार रुपये दंड भरावा लागेल. 

It’s strange to hear … After 23 years, for stealing a fan, punishment, one year imprisonment with fine

सहायक जिल्हा लोक अभियोजन अधिकारी संजीव पांडे यांनी सांगितले की 23 मार्च 1998 रोजी शहरातील मध्य कोतवाली भागात एका चौकीदाराच्या सजगतेमुळे शंकर दुकानात दोन पंखे चोरतांना पकडला गेला.

 ते म्हणाले, 1998 साली चोरी झालेल्या दोन पंख्यांची एकूण किंमत सुमारे 500 रुपये असेल. संजीव पांडे यांनी सांगितले की जामिनावर तुरुंगातून सुटल्यानंतर शंकर फरार झाला , त्यामुळे पंखा चोरीच्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होण्यास बराच काळ लागला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*