बेनामी संपत्ती प्रकरणी चौकशी झाल्याचे रॉबर्ट वाड्रांनी नाकारले; म्हणाले, मी प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली; आयकर विभागाने रॉबर्ट वाड्रांचा जबाब नोंदविला

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बेनामी संपत्ती गोळा केल्या प्रकरणी आयकर विभागाने काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचा जबाब नोंदवून घेतल्याची बातमी एएनआय वृत्तसंस्थेने आधी दिली. पण ही चौकशी बेनामी संपत्ती प्रकरणात झाल्याचे वाड्रा यांनी नंतर नाकारले. It was nothing related to Benami property. Justice and truth will prevail. I have nothing to hide and worry. I will always cooperate: Robert Vadra

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मी दिली. मी त्यांना चौकशीत सहकार्यच केले, असे वाड्रा यांनी नंतर एएनआयला सांगितले. माझ्याकडे लपविण्यासारखे आणि काळजी करण्यासारखे काही नाही. चौकशीतून सत्य बाहेर येईलच, असेही त्यांनी स्पष्ट केले.या आधी तपासाशी संबंधित आयटी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर एएनआयने बातमी दिली की, बेनामी संपत्ती प्रकरणात आयटी टीमने रॉबर्ट वाड्रांच्या सुखदेव विहार येथील कार्यालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदवून घेतला. रॉबर्ट वाड्रा यांनी लंडनमधील ब्रायनस्टन स्क्वेअर येथे 1.9 दशलक्ष डॉलर्स किंमतीचे घर विकत घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर पैशांच्या अफरातफरीचा आरोप आहे. वाड्रा सध्या अटकपूर्व जामिनावर बाहेर आहेत. आयटी विभागाव्यतिरिक्त सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी देखील अफरातफरी प्रकरणात त्यांची कायदेशीर चौकशी करत आहे.

यापूर्वी ईडीने वाड्रा हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोप केला होता. पण वाड्रांच्या वकिलांनी ईडीचे म्हणणे फेटाळून लावत एजन्सी क्लायंटला जेव्हा चौकशीसाठी बोलवेल तेव्हा रॉबर्ट वाड्रा हजर राहतील. आतापर्यंत त्यांनी तपासात पूर्णपणे सहकार्य केले आहे, असा दावा केला आहे.

It was nothing related to Benami property. Justice and truth will prevail. I have nothing to hide and worry. I will always cooperate: Robert Vadra

ईडीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे त्यांच्या क्लायंटने दिली आहेत. ईडीने केलेल्या आरोपाचे खंडन करणे म्हणजे त्यांना तपासात सहकार्य न करणे असा होत नाही, असाही दावा रॉबर्ट वाड्राच्या वकिलांनी केला होता. नंतर वकिलांच्या उपस्थितीतच बेनामी प्रकरणी चौकशी झाल्याचे रॉबर्ट वाड्रांनी नाकारले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*