इराणचा पाकिस्तानात सर्जीकल स्ट्राईक; दोन डांबलेल्या सैनिकांची सुटका ; बलुचिस्तानात आक्रमक कारवाई

वृत्तसंस्था

तेहरान : इराणने पाकिस्तानमध्ये काल रात्री सर्जीकल स्ट्राईक करून दोन सैनिकांची सुटका केली आहे. इराणच्या इलाइट रेव्होल्युशनरी गार्डनी या कारवाईत भाग घेऊन बंधकांची सुटका केली.Iran surgical strike in Pakistan

जैश उल अद्ल या दहशतवादी संघटनने दोन वर्षापूर्वी इराणच्या सैनिकांचे अपहरण केले होते. त्यांना पकडून ठेवले होते. जैश उल अद्ल ही बलुचिस्तानातील संघटना आहे. त्यांच्या ताब्यातून सैनिकांची सुटका करण्यासाठी हे सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले.पाकिस्तान आणि इराण सीमेवर जैश उल अद्ल या दहशतवादी संघटनेने इराणच्या 12 सैनिकांचे 2018 मध्ये अपहरण केले होते. त्यापैकी 5 आणि 4 जणांची सुटका अनुक्रमे इराणी आणि पाकिस्तानी सैनिकांनी कारवाई करून केली होती. आता इराणने स्वतःच सर्जिकल स्ट्राईक करून दोन बंधकांची सुटका केली असून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Iran surgical strike in Pakistan

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*