IPS Praveen Kumar's anti-Hindu propaganda, swears to school children not to believe in any Hindu God

IPS प्रवीण कुमार यांचा अँटी हिंदू प्रोपगेंडा, कोणत्याही हिंदू देवतेला मानणार नसल्याची शालेय विद्यार्थ्यांना दिली शपथ

तेलंगणाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरएस प्रवीण कुमार यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते विद्यार्थ्यांना हिंदू धर्माविरोधी शपथ देताना दिसत आहेत. ‘भविष्यात मी कोणत्याही हिंदू धर्माचे आणि परंपरेचे पालन करणार नाही, राम-कृष्ण यांची पूजा करणार नाही,” अशी शपथ ते शालेय विद्यार्थ्यांना देताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. आयपीएस प्रवीण कुमार हे सध्या तेलंगण समाज कल्याण निवासी शैक्षणिक संस्था संस्थेचे (टीएसडब्ल्यूआरआयएस) सचिव आहेत. त्यांचा हा आक्षेपार्ह व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. यात बरेच लोक हिंदूविरोधी प्रचारात सहभागी असल्याचे दिसून येत आहे. IPS Praveen Kumar’s anti-Hindu propaganda, swears to school children not to believe in any Hindu God


विशेष प्रतिनिधी

हैदराबाद : तेलंगणाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरएस प्रवीण कुमार यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते विद्यार्थ्यांना हिंदू धर्माविरोधी शपथ देताना दिसत आहेत. ‘भविष्यात मी कोणत्याही हिंदू धर्माचे आणि परंपरेचे पालन करणार नाही, राम-कृष्ण यांची पूजा करणार नाही,” अशी शपथ ते शालेय विद्यार्थ्यांना देताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. आयपीएस प्रवीण कुमार हे सध्या तेलंगण समाज कल्याण निवासी शैक्षणिक संस्था संस्थेचे (टीएसडब्ल्यूआरआयएस) सचिव आहेत. त्यांचा हा आक्षेपार्ह व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. यात बरेच लोक हिंदूविरोधी प्रचारात सहभागी असल्याचे दिसून येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएस प्रवीण कुमारांनी तेलंगणातील पेद्दापल्ली जिल्ह्यातील धुलीकट्ट परिसरातील बौद्ध मंदिरात सुरू केलेल्या ‘स्वैरो पवित्र महिन्याच्या’ सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांविरुद्ध हिंदूविरोधी शपथ दिली आहे. त्याच घटनेच्या एका व्हिडिओमध्ये प्रवीणकुमार अबोध मुलांना शपथ देताना दिसत आहेत. “माझा गौरी, गणपती आणि इतर हिंदू देवतांवर विश्वास नाही. मी त्यांची उपासना करणार नाही. मी त्यांना देवाचा अवतार मानत नाही. मी श्राद्धा कर्म करणार नाही किंवा पिंडदान करणार नाही. मी बुद्धांनी दाखविलेल्या मार्ग आणि तत्त्वांपेक्षा भिन्न असेल असे काहीही करणार नाही. मी कधीही मद्यपान करणार नाही. मी राम-कृष्णावरही विश्वास ठेवणार नाही.” अशी शपथ त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिली आहे.

तेलंगण राज्य सरकारने 2014 मध्ये गरजू व वंचितांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि सरकारच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या अनेक शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे चालविण्यासाठी TSWREISची स्थापना केली होती. या संस्थेचे सचिव पद आयपीएस प्रवीण कुमार यांच्याकडे आहे. एका आयपीएस अधिकाऱ्याच्या अशा भूमिकेमुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.

IPS Praveen Kumar’s anti-Hindu propaganda, swears to school children not to believe in any Hindu God

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*