शरजीलकडून हिंदूंचा अपमान, मुश्रीफांकडून लोकमान्यांचा अपमान; एल्गार परिषदेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा असा “सन्मान”

विशेष प्रतिनिधी

पुणे : एल्गार परिषदेत शरजील उस्मानीच्या सगळा हिंदू समाज सडलाय, या हिंदूंचा अपमान करणाऱ्या घृणास्पद वक्तव्याचा सर्वत्र जाहीर निषेध होत असतानाच त्याच परिषदेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या अपमानाचे दुसरे वक्तव्य समोर येते आहे. हे वक्तव्य केलेय, माजी आयपीएस अधिकारी आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे बंधू शमीम मुश्रीफ यांनी.IPS officer shameem mushrif insults lokmanya bal gangadhar tilak in elgar parishad

हिंदूंचा अपमान केल्यावरून राज्यभरात संताप उसळल्यानंतर ठाकरे – पवार सरकारला जाग येऊन शरजील विरोधात गुन्हा करण्यात आला पण अद्याप त्याच्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतरच त्याच एल्गार परिषदेतून शमीम मुश्रीफांचे लोकमान्य टिळकांचा अपमान करणारे वक्तव्य समोर आले आहे.त्याचा विडिओ देखील व्हायरल झाला आहे. यात शमीम मुश्रीफ म्हणतात, की जेव्हा महात्मा जोतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पुण्यात शाळा सुरू करून त्यांना शिकवायला सुरूवात केली, तेव्हा बाळ गंगाधर टिळकांनी, ज्यांना लोक चुकून लोकमान्य टिळक म्हणतात, त्यांनी विरोध केला होता. असा चुकीचा संदर्भ देणारे वक्तव्य शमीम मुश्रीफांनी केले आहे.

यावरून राज्यात संताप उसळला असून एल्गार परिषदेचा तीव्र निषेध होतो आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शमीम मुश्रीफांच्या भाषणाचा विडिओ ट्विट करून राज्यातील ठाकरे – पवार सरकारला याचसाठी तुम्ही एल्गार परिषदेला परवानगी दिली होती का, असा सवाल केला आहे.

तसेच, ज्या बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही नाव लावून वारसा चालवता त्यांना हे असले भाषण चालले असते का, अशा चिथावणीखोर आणि समाजात तेढ पसरविणाऱ्यांच्या विरोधात ठाकरे – पवार सरकार कधी परिणामकारक कारवाई करणार, असे रोकडे सवाल केले आहेत.

सोशल मीडियातूनही शरजील आणि मुश्रीफ यांच्या वक्तव्यांवरून संताप उसळत असून या दोघांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून पुढे येऊ लागली आहे.

IPS officer shameem mushrif insults lokmanya bal gangadhar tilak in elgar parishad

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*