Investigation Reveals Khalistan group Provides toolkit to Greta Thunberg for anti-India propaganda

ग्रेटा थनबर्गला भारतविरोधी अपप्रचारासाठी खलिस्तान समर्थक संघटनेने दिले टूलकिट, तपासातून मोठा खुलासा

शेतकरी आंदोलनाच्या बहाण्याने भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा आता पर्दाफाश झाला आहे. तपासातून याचा खुलासा झाला. कृषी कायद्याविरोधात भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने केलेले ट्विट खलिस्तानी संघटनेच्या अपप्रचाराचा एक भाग होता. वास्तविक, ग्रेटा थनबर्गने तिचे एक ट्विट नंतर स्वत: हटवले. त्याच्या प्राथमिक तपासणीत असे समोर आले आहे की, त्यामागे कॅनडास्थित खलिस्तानला पाठिंबा देणारी संघटना आहे. Investigation Reveals Khalistan group Provides toolkit to Greta Thunberg for anti-India propaganda


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या बहाण्याने भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा आता पर्दाफाश झाला आहे. तपासातून याचा खुलासा झाला. कृषी कायद्याविरोधात भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने केलेले ट्विट खलिस्तानी संघटनेच्या अपप्रचाराचा एक भाग होता. वास्तविक, ग्रेटा थनबर्गने तिचे एक ट्विट नंतर स्वत: हटवले. त्याच्या प्राथमिक तपासणीत असे समोर आले आहे की, त्यामागे कॅनडास्थित खलिस्तानला पाठिंबा देणारी संघटना आहे.

याबाबत उच्च सरकारी सूत्रांनी सांगितले की, ग्रेटा थनबर्गने आपल्या ट्विटमध्ये वापरलेल्या पॉवर पॉइंट टूलकिटचा हेतू भारताचा अपप्रचार होता. हे प्रेझेंटेशन खलिस्तान समर्थक धालीवाल यांनी स्थापन केलेल्या ‘पीस फॉर जस्टीस’ संस्थेने तयार केले होते. ही संस्था कॅनडाच्या व्हँकुव्हरमध्ये आहे.

पॉवरपॉइंटमध्ये भारताला स्टेप-बाय-स्टेप कसे टारगेट करायचे, याची पूर्ण रूपरेखा होती. या टूलकिटमध्ये ‘भारताच्या योग आणि चहाची प्रतिमा मलिन करणे’, ’26 जानेवारी रोजी जागतिक संघर्ष’ तसेच ‘कृषी कायदे रद्द करण्याचे लक्ष्य’ होते. शेअर केल्याच्या वेळाने थनबर्गने ही टुलकिट लिंक हटवली. परंतु तत्पूर्वी भारतातील बहुतांश जणांनी त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवले होते. जे नंतर व्हायरल झाले.टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, “ग्रेटाने चुकीच्या पद्धतीने शेअर केलेल्या कागदपत्रांवरून असे दिसतेय की, रिहाना आणि इतरांनी केलेले ट्वीट म्हणजे भारताची प्रतिमा डागाळण्याची मोठी मोहीम आहे. याप्रकारे सर्व वक्तव्ये/ट्वीट भारत आणि परदेशात महत्त्वाच्या व्यक्तींनी पाहणेही विशेष आहे.

केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंग यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, “थनबर्गने हटवलेल्या ट्विटवरून भारताविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय षडयंत्राचे खरे डिझाइन समोर आले आहे. या यंत्रणेला बळ देणाऱ्या संघटनांची चौकशी होणे गरजेचे आहे. सिंग म्हणाले की, त्यांना ‘कसे’, ‘केव्हा’ आणि ‘काय’ करायचे याची संपूर्ण माहिती देण्यात आली होती.

Investigation Reveals Khalistan group Provides toolkit to Greta Thunberg for anti-India propaganda

भाजप प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले, “थनबर्गने शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केलेले टूलकिट म्हणजे प्रत्यक्षात अराजकाची पाठशाळा होती. त्यांचा (परदेशी व्यक्तींचा) या कायद्यांशी काहीही संबंध नाही, त्यांना फक्त देशात अराजकता निर्माण करायची आहे.

Investigation Reveals Khalistan group Provides toolkit to Greta Thunberg for anti-India propaganda

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*