दिल्लीतली नेटसेवा काही ठिकाणी बंद; शेतकरी आंदोलन हिंसक झाल्याचा परिणाम दिल्लीकरांना लागतोय भोगायला


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन हिंसक झाल्यानंतर पोलिसांना लाल किल्ला, ननगोळी परिसरात आंदोलकांवर लाठमार करावा लागला. पण आंदोलन आणखी चिघळू नये आणि त्याचा वणवा इतरत्र पेटू नये, यासाठी दिल्लीतली आणि एनसीआर परिसरातली नेटसेवा काही काळापुरती आणि काही ठिकाणी बंद केली आहे. ग्रे लाइनच्या सर्व मेट्रो स्टेशनची सर्व एन्ट्री आणि एक्झिट गेट बंद केली आहेत. internet service in Delhi closed in some place movement violentशेतकरी आंदोलक हिंसक होऊन पोलिसांवर ट्रॅक्टर घालताहेत. आंदोलन शेतकरी नेत्यांच्या हाताबाहेर गेले आहे. शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत मात्र कानावर हात ठेवताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस प्रचंड संयमी भूमिका घेऊन आंदोलकांना हाताळताना दिसत आहेत.

आम्ही सकाळपासून शेतकरी आंदोलकांना नियोजित मार्गावरून मोर्चा काढण्याची विनंती करीत आहोत. पण आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडल्यात. बसची तोडफोड केली आहे. ते लाल किल्ल्यात घुसून झेंडे फडकावत आहेत. आम्ही सगळ्या शेतकरी संघटनांना शांतता आणि संयमी आंदोलनाचे अपील केले आहे.

पण आंदोलक ऐकत नाहीत. आंदोलन शांततेत करण्याचे आश्वासन शेतकरी नेत्यांनी दिले होते, पण हे अजिबात शांततापूर्ण आंदोलन नाही, असे परखड बोल ननगोळी, दिल्लीच्या जॉइंट सीपी शालिनी सिंग यांनी आंदोलकांना सुनावले आहे. एवढे सगळे झाल्यानंतर राहुल गांधी यांचे शेतकरी आंदोलकांना शांततेचा उपदेश करणारे ट्विट आले आहे.

internet service in Delhi closed in some place movement violent

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती