पोलीस दलातील चुका सुधारण्याऐवजी त्याची पुनरावृत्ती केली, उध्दव ठाकरे यांचे करिअर ढासळले, वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांचा आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोलीस दलातील चुकीचे काम सुधारण्यााची संधी होती. परंतु त्याऐवजी त्यांनी पुन्हा त्याच चुकांची पुनरावृत्ती केली. त्यामुळे आता त्यांचे करिअर जवळजवळ ढासळले आहे, असा आरोप राज्यातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोलीस दलातील चुकीचे काम सुधारण्यााची संधी होती. परंतु त्याऐवजी त्यांनी पुन्हा त्याच चुकांची पुनरावृत्ती केली. त्यामुळे आता त्यांचे करिअर जवळजवळ ढासळले आहे, असा आरोप राज्यातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी केला आहे. Instead of correcting the mistakes in the police force, it was repeated, Uddhav Thackray’s career was ruined, senior IPS officer Sanjay Pandey accused

संजय पांडे यांनी उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी असूनही मला पोलिस आस्थापना मंडळाचा सदस्यदेखील बनवण्यात आलेले नाही. माझ्या बदल्या व पोस्टिंगची चर्चा व निर्णय माझ्यापेक्षा कनिष्ठ अधिकारी घेत आहेत ही किती वेदनादायक गोष्ट आहे.संजय पांडे म्हणाले, मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी केलेल्या परमबीर सिंहांनी देवेन भारतींच्या विरोधात तपासामध्ये साक्षीदारांना धमकावले. अतिरिक्त सचिवांनी याच प्रकरणात तपास रोखण्याचा आदेश दिला. अलिकडच्या वर्षांत त्यांच्यावर काही गोपनीय चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सर्व आव्हाने असूनही त्याने ते पूर्ण केले. शरद पवार यांच्यासह इतर अनेक अधिकाºयांनी त्यांचे कौतुक केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: अतिरिक्त पोलिस महासंचालक देवेन भारती यांच्याविरोधात काही तक्रारींच्या तपासाची फाइल मला दिली. मी अहवाल सादर केला तेव्हा त्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले होते. अगदी शरद पवार यांनी मला सांगितले होते की तुम्ही स्वत: माझे कौतुक केले आहे.

पोलिस आयुक्त आणि एडीजी कार्यालयाने देवेन भारती यांच्याविरूद्ध केलेल्या तक्रारीच्या चौकशीत अडथळे कसे निर्माण केले. परमबीर सिंह यांनी साक्षीदारांना धमकावले होते आणि सरकारकडे तक्रार देखील केली होती. नंतर तत्कालीन मुख्य सचिव संजय कुमार यांच्या आदेशानुसार ही चौकशी थांबवण्यात आली होती, ते मी तुमच्यासमवेत बैठकीत सांगितले होते.

माजी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यावर आरोप करताना संजय पांडे यांनी लिहिले आहे की, जेव्हा फिनोलेक्स प्रकरणात पिंपरी-चिंचवडमध्ये खटला दाखल करीत नव्हते, तेव्हा मला त्याबद्दल जबाबदारी देण्यात आली होती. मी पुढे गेलो तेव्हा जयस्वाल यांनी मला सांगितले की मी पोलिस अधिकारी नाही. माझ्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. पण शेवटी माझ्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

Instead of correcting the mistakes in the police force, it was repeated, Uddhav Thackray’s career was ruined, senior IPS officer Sanjay Pandey accused

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*