Inspiring : वयाच्या 14व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी दोन मुले, हार न मानता जिद्दीने बनल्या आयपीएस ऑफिसर

Inspiring Story Of IPS N Ambika Who Married at the age of 14, had two children at the age of 18, became an IPS officer without giving up

मनात जिद्द असेल तर माणसाला काहीही अशक्य नाही. जिद्दीपुढे संकटांचे मोठमोठे डोंगरही कोसळतात. अशाच एका प्रेरणादायी स्त्रीची ही कहाणी आहे. आयपीएस अधिकारी असलेल्या अंबिका यांनी आपल्या कर्तृत्वाने देशभरातील मुलींसमोर आदर्श ठेवला आहे. सामान्य व्यक्ती कल्पनाही करू शकणार नाही, अशा संकटांना तोंड देत त्यांनी यशाला गवसणी घातली आहे. Inspiring Story Of IPS N Ambika Who Married at the age of 14, had two children at the age of 18, became an IPS officer without giving up


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मनात जिद्द असेल तर माणसाला काहीही अशक्य नाही. जिद्दीपुढे संकटांचे मोठमोठे डोंगरही कोसळतात. अशाच एका प्रेरणादायी स्त्रीची ही कहाणी आहे. आयपीएस अधिकारी असलेल्या अंबिका यांनी आपल्या कर्तृत्वाने देशभरातील मुलींसमोर आदर्श ठेवला आहे. सामान्य व्यक्ती कल्पनाही करू शकणार नाही, अशा संकटांना तोंड देत त्यांनी यशाला गवसणी घातली आहे.

तामिळनाडूतील एन. अंबिका यांचे वयाच्या 14व्या वर्षी पोलिस कॉन्स्टेबलशी लग्न झाले होते. लग्नाच्या चार वर्षांनंतरच 18व्या वयात त्या दोन मुलांच्या आई बनल्या. असे असूनही त्या परिस्थितीला शरण गेल्या नाहीत, आयुष्यात मोठे स्थान मिळविण्यासाठी धडपडत राहिल्या. अंबिका एकदा पतीसमवेत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला पोहोचल्या. तेथे त्यांनी पतीला त्यांच्या अधिकाऱ्यांना सॅल्यूट करताना पाहिले.अधिकाऱ्यांना सॅल्यूट करताना पाहून अंबिका यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यांनी पतीला याबाद्दल विचारले की, हे कोण आहेत, ज्यांना सॅल्यूट केले जातेय? अंबिकाच्या या प्रश्नावर पती म्हणाले की, ते आयपीएस अधिकारी आहेत, माझे सीनियर ऑफिसर आहेत. झालं, अंबिका यांनीही IPS होण्याचा चंग बांधला. लग्नाच्या वेळी दहावी पासही नसल्याने अंबिकाला IPS अधिकारी होणे इतके सोपे नव्हते.

तरीही अंबिका यांनी आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा निश्चय केला. त्यांनी प्रथम खासगी संस्थेतून दहावी व बारावी उत्तीर्ण केली आणि त्यानंतर पदवी पूर्ण केली. आयपीएस अधिकारी होण्यासाठी अंबिका यांना नागरी सेवा परीक्षाही द्याव्या लागणार होत्या. यासाठी त्यांना कोचिंगसाठी चेन्नईला जावे लागले. अशा परिस्थितीत त्यांचे पती कर्तव्यासह दोन्ही मुलांची देखभाल करत राहिले. पण एवढ्यावरच संकटांची मालिका थांबणार थोडीच होती, सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत अंबिका यांना एक-दोन नव्हे तर तीन वेळा अपयश आले.

Inspiring Story Of IPS N Ambika Who Married at the age of 14, had two children at the age of 18, became an IPS officer without giving up

सलग तीन वेळा अपयशी ठरल्यानंतर पतीने अंबिका यांना घरी परतण्यास सांगितले. पण अंबिका परतल्या नाहीत आणि अखेरचा प्रयत्न करण्याची पतीकडे परवानगी मागितली. पतीनेही अंबिका यांचा दृढ निश्चय पाहून ती दिली. मग काय, अंबिका यांनी चौथ्यांदा प्रयत्न केला आणि 2008 मध्ये उत्तीर्ण झाल्या. त्या IPS अधिकारी बनल्या. IPS अधिकारी झाल्यानंतर अंबिका यांना महाराष्ट्रात पहिली पोस्टिंग मिळाली. सध्या ते लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जातात. अंबिका या मुंबईत डीसीपी पदावर कार्यरत आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती